कृषिमंत्री पोहोचले शेतकऱ्यांच्या बांधावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 01:19 AM2020-02-14T01:19:52+5:302020-02-14T01:20:27+5:30
राज्याच्या कृषी खात्याने शेतकºयांना उत्पादनवाढीसाठी प्रोत्साहित करतानाच त्यांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी ‘एक दिवस शेतावर’ हा उपक्रम सुरू केला असून खुद्द राज्याचे कृषीमंत्री महिन्यातून एक दिवस या उपक्रमासाठी देणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर दादा भुसे यांनी मालेगाव तालुक्यातील वळवाडे येथील शेतकरी शांताराम गवळी यांच्या शेतावर भेट देऊन त्यांच्याशी विविध प्रश्नांवर संवाद साधला.
नाशिक : राज्याच्या कृषी खात्याने शेतकºयांना उत्पादनवाढीसाठी प्रोत्साहित करतानाच त्यांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी ‘एक दिवस शेतावर’ हा उपक्रम सुरू केला असून खुद्द राज्याचे कृषीमंत्री महिन्यातून एक दिवस या उपक्रमासाठी देणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर दादा भुसे यांनी मालेगाव तालुक्यातील वळवाडे येथील शेतकरी शांताराम गवळी यांच्या शेतावर भेट देऊन त्यांच्याशी विविध प्रश्नांवर संवाद साधला.
खुद्द कृषीमंत्री आपल्या बांधावर अवतरल्याने शेतकºयांनीही आनंद व्यक्त करीत आपले मन मोकळे केले. यावेळी शेतकºयांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन कृषीमंत्री भुसे यांनी दिले.राज्यातील शेतकºयांच्या शेतातील पिकांचे उत्पादन वाढी बरोबरच त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महिन्यातुन एक दिवस कृषीमंत्री शेतकºयांच्या बांधावर या उपक्रमांतर्गत भुसे यांनी गुरुवारी (दि.१३) वळवाडे येथे भेट दिली. यावेळी भुसे यांनी शेतकºयांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन निर्यातक्षम उत्पादन घेण्याचे आवाहन केले. शेतकरी गवळी यांच्याशी चर्चा करताना कृषी विभागातील अधिकारी शेतात येतात का, याची त्यांनी विचारणा केली. दरम्यान, शेतकºयांनी पीक विमा योजनेची मागणी केली. त्यानंतर दादा भुसे यांनी मालेगाव तालुक्यातीलच वडनेर, खाकुर्डी, अजंग, वडेल, सावतावाडी, झोडगे, पळासदरे व सायने या गावांना भेटी देऊन तेथील शेतकºयांशी संवाद साधला.
कांदा निर्यातबंदी उठविण्याचे प्रयत्न
कांदा निर्यातबंदी उठवावी यासाठी केंद्राकडे राज्य शासनाच्या कृषी विभागातर्फे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी शेतकºयांना सांगितले. याशिवाय पीक विमा कंपन्यांची बैठक घेतली. येत्या पंधरा दिवसात शेतकºयांचे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी शेतकºयांना दिल्याने शेतकºयांनी समाधान व्यक्त केले. शेतकरी सन्मान व मार्गदर्शक कक्ष उभारण्यात आला आहे. शुक्रवारी (दि.१४) जिल्हा आणि विभागवार आढावा बैठका घेत असल्याची माहिती यावेळी कृषिमंत्री भुसे यांनी दिली. कृषी विभागाच्या अधिकाºयांना शेतकºयांचे प्रश्न तातडीने सोडविण्याच्या सूचना भुसे यांनी यावेळी दिल्या.