कृषीमंत्र्यांकडून शिवभोजन केंद्राची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2020 05:36 PM2020-03-09T17:36:07+5:302020-03-09T17:36:53+5:30
मालेगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सुरू झालेल्या शिवभोजन केंद्राची सोमवारी कृषीमंत्री दादा भुसे यांनी पाहणी करुन आढावा घेतला.
राज्य शासनाने बाजार समिती आवारात साईश्रद्धा महिला बचत गट व दयानंद ग्रुपला शिवभोजन केंद्र चालविण्यास दिले आहे. शासनातर्फे दररोज २०० नागरिकांना अल्प दरात जेवण दिले जात आहे; मात्र मालेगावी सामाजिक संस्थांची व व्यक्तींची मदत घेवून दररोज ३०० थाळ्यांचे वितरण केले जात आहे. सोमवारी भुसे यांनी केंद्राला भेट देवून भोजन व्यवस्थेची पाहणी केली. तसेच प्रस्तावित दोघा शिवभोजन केंद्रांच्या जागेची पाहणी करुन अधिकाऱ्यांना सूचना केल्या. यावेळी पवन टिबडेवाल, पिंटू कर्नावट, हरी निकम, विशाल पाटील, दिपक मेहता, शितल संघवी, सुभाष चोरडीया, सुशिल नहार, भिका कोतकर, पारस कर्नावट, बाजार समितीचे सचिव अशोक देसले, हार्दिककुमार जैन आदि उपस्थित होते.