गर्भगळीत टोमॅटो उत्पादकांकडे कृषिमंत्र्यांची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:17 AM2021-08-29T04:17:30+5:302021-08-29T04:17:30+5:30
चौकट==== पिकेल ते विकेल कागदावरच कृषी खात्याने शेतकऱ्यांच्या भल्यासाठी ‘पिकेल ते विकेल’ या योजनेचा मोठा गाजावाजा करून शुभारंभ केला ...
चौकट====
पिकेल ते विकेल कागदावरच
कृषी खात्याने शेतकऱ्यांच्या भल्यासाठी ‘पिकेल ते विकेल’ या योजनेचा मोठा गाजावाजा करून शुभारंभ केला असला तरी, टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसाठी ‘पिकेल ते विकेल’ ही योजना कागदावरच राहिली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्याने पिकविलेला माल सरकारच्या मदतीने योग्य भावात विकून देण्याची ही योजना असून, शेतकऱ्यांचा टोमॅटो रस्त्यावर फेकण्याची वेळ आलेली असताना कृषी विभागाने मात्र त्यापासून हात झटकले आहेत.
चौकट====
भारती पवार सरस ठरल्या
जिल्ह्यातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना रस्त्यावर टोमॅटो फेकण्याची वेळ आल्याचे पाहून केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी तात्काळ केंद्रीय वाणिज्य व कृषिमंत्र्यांशी संपर्क साधून टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याची विनंती केली असता, केंद्राच्या कृषी मंत्रालयाच्या मुख्य सचिवांनी तातडीने बाजार हस्तक्षेप योजना लागू करण्याची तयारी दर्शविली व राज्य सरकारने टोमॅटो खरेदी करून त्याचा खर्च केंद्र व राज्य सरकार अर्धा अर्धा उचलण्याची सूचना केली. मात्र, जिल्ह्यात कृषिमंत्री असताना त्यांनी टोमॅटो उत्पादकांना साधा दिलासा तर दिलाच नाही उलट केंद्राच्या सूचनेकडे कृषी विभागाने त्याकडे साफ दुर्लक्ष केले.