विभागातर्फे त्र्यंबकेश्वर तालुक्यात कृषी संजीवनी सप्ताह !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 08:08 PM2020-07-04T20:08:08+5:302020-07-04T20:09:11+5:30
त्र्यंबकेश्वर : नुकताच कृषी दिना निमित्त राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे आमदार हिरामण खोसकर यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्र म ...
त्र्यंबकेश्वर : नुकताच कृषी दिना निमित्त राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे आमदार हिरामण खोसकर यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्र म विविध उपक्र मांनी कृषी दिन साजरा करण्यात आला.
यावेळी तालुक्यात कृषी संजीवनी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात महिलांसाठी कृषी कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत असुन या कार्यशाळेस महिलांची लक्षणीय उपस्थिती दिसुन येत आहे.
तालुका कृषी अधिकारी संदीप वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील कृषी सहायक मंडल कृषी अधिकारी कृषी पर्यवेक्षक आदी या महिला तसेच पुरु ष कृषी शाळा भरवित आहेत.
कृषि विभागामार्फत कृषि संजीवनी सप्ताहाच्या निमित्ताने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सामुंडी येथे कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्पाच्या माध्यमातुन महिलांची भात पिक शेतीशाळेच्या दुसऱ्या वर्गाचे आयोजन करण्यात आले. या वर्गात प्रशिक्षाणार्थींना चटाई रोपवाटीकेचे महत्व, यंत्राद्वारे भात लागवडीच्या खर्चाचा ताळेबंद, तसेच युरिया डीएपी ब्रीकेटच्या वापराबाबत माहीती देण्यात आली.
कृषि मंत्री भुसे यांनी महिलांच्या शेतीशाळेची संकल्पना मांडली. त्यास अनुसरु न त्र्यंबकेश्वर तालुक्यात कोणे, खरोली, खंबाळे व सामुंडी येथे महिला शेतीशाळा सुरु करण्यात आल्या असुन त्यास चांगला प्रतीसाद मिळतांना असल्याची माहिती तालुका कृषी अधिकाऱ्यांनी दिली.