दिंडोरीचा कृषी पर्यवेक्षक लाच घेताना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 06:06 PM2019-06-27T18:06:18+5:302019-06-27T18:06:33+5:30

नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले

Agriculture Supervisor of Dindori arrested for accepting bribe | दिंडोरीचा कृषी पर्यवेक्षक लाच घेताना अटक

दिंडोरीचा कृषी पर्यवेक्षक लाच घेताना अटक

Next
ठळक मुद्दे प्रस्ताव मंजूर करण्यासाठी कृषी पर्यवेक्षक लक्ष्मण नारायण काळे याने तक्रारदाराकडे पाचशे रुपये लाचेची मागणी केली

नाशिक : शेतकऱ्यांना विक्री केलेल्या ठिबक सिंचनाच्या शासकीय अनुदानाचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी पाचशे रुपयांची लाच स्वीकारताना दिंडोरी येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी पर्यवेक्षक लक्ष्मण नारायण काळे यास नाशिकच्यालाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचा कृषी साहित्य विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांनी शेतकऱ्यांना विक्री केलेल्या ठिबक सिंचनाचे शासकीय अनुदान मिळण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केला होता. सदर प्रस्ताव मंजूर करण्यासाठी कृषी पर्यवेक्षक लक्ष्मण नारायण काळे याने तक्रारदाराकडे पाचशे रुपये लाचेची मागणी केली. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्यानुसार, पथकाने पडताळणी करुन सापळा रचला असता लक्ष्मण काळे हे जनता विद्यालयाच्या कोपºयावर लाच स्वीकारताना रंगेहात पकडले गेले. लाचलुचपत विभागाने काळे यांना अटक केली आहे.

Web Title: Agriculture Supervisor of Dindori arrested for accepting bribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.