भारनियमनामुळे शेतीची कामे खोळंबली

By admin | Published: November 16, 2016 11:51 PM2016-11-16T23:51:27+5:302016-11-16T23:48:33+5:30

भारनियमनामुळे शेतीची कामे खोळंबली

Agriculture works due to weight loss | भारनियमनामुळे शेतीची कामे खोळंबली

भारनियमनामुळे शेतीची कामे खोळंबली

Next

लोहोणेर : १२ तास वीजपुरवठा बंद असल्याने गैरसोयलोहोणेर : भारनियमनामुळे परिसरातील शेतीची कामे खोळंबली असून, वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
लोहोणेर, ठेंगोडा, सावकी आदि परिसरात वीज वितरण कंपनीच्या वतीने करण्यात येणारे सुमारे १२ तासांचे भारनियमन रद्द करून परिसरातील शेतकऱ्यांना वीज वितरण कंपनीने मदतीचा हात द्यावा, अशी मागणी लोहोणेर, ठेंगोडा, सावकी येथील ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे. लोहोणेर, ठेंगोडा, सावकी आदि परिसरात राज्य वीज वितरण कंपनीच्या ठेंगोडा येथील ३३/११ केव्ही सबस्टेशनमधून विद्युत पुरवठा करण्यात येतो, तर या विद्युत केंद्रास देवळा व सटाणा येथील उच्च दाबाच्या केंद्रामधून वीजपुरवठा करण्यात येतो. सध्या लोहोणेरसह परिसरात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड सुरू आहे.
वीज वितरण कंपनीच्या वतीने लोहोणेर परिसरात गेल्या कित्येक दिवसांपासून सकाळी ११ ते रात्री ११ पर्यंत लोडशेडिंग करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना यामुळे नाहक पश्चात्तापाची वेळ आली आहे.
लोडशेडिंग बंद करून सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत करावे, अशी मागणी सतीश देशमुख, दीपक बच्छाव, राकेश गुळेचा, राजेन्द्र वाघ, रमेश आहिरे, संजय शेवाळे, अनिल आहिरे, मदन साखरे, कारभारी पगार, मोती चौधरी, सुनील परदेशी, सुरेश पाटील, अरुण शिवले, संजय परदेशी, अशोक अलई आदिंनी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Agriculture works due to weight loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.