अहेर यांनी मांडला अनागोंदी कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 12:56 AM2018-12-21T00:56:50+5:302018-12-21T00:57:14+5:30

नाशिक : नांदगाव तालुक्यातील पिंपरखेड येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील अनागोंदी कारभार अश्विनी अहेर यांनी चव्हाट्यावर आणला. काही वर्षांपर्यंत ४०० ...

Aher has organized Mandla chaos | अहेर यांनी मांडला अनागोंदी कारभार

अहेर यांनी मांडला अनागोंदी कारभार

Next
ठळक मुद्देआरोप : जिल्हा परिषदेच्या सभेत आरोग्य केंद्राच्या बेबंद कारभाराचा पंचनामा

नाशिक : नांदगाव तालुक्यातील पिंपरखेड येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील अनागोंदी कारभार अश्विनी अहेर यांनी चव्हाट्यावर आणला. काही वर्षांपर्यंत ४०० ते ५०० ओपीडी असलेल्या आरोग्य केंद्रात आजमितीस केवळ ४ ते ५ रुग्ण अशी आवस्था असून, त्यास येथील तालुका वैद्यकीय अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप केला. आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला आहेच शिवाय वैद्यकीय अधिकारी या ठिकाणी थांबत नसल्याने रुग्णांची गैरसोय होते असे अहेर यांनी निदर्शनास आणून दिले. गेल्या अडीच वर्षांपासून येथे औषधांचा साठा पडून असून त्याचा वापरच झालेल नाही. वैद्यकीय अधिकाऱ्याच्या क्वार्टर्समध्ये तर आरोग्यसेवेशी संबंधित चांगल्या स्थितीतील वस्तू पडून असल्याचे समितीच्या निदर्शनास आले आहे. अतिशय निर्गमतेने येथील कारभार सुरू असल्याचा घणाघाती आरोप अहेर यांनी यावेळी केला.

उपाध्यक्षांना अंधारात ठेवून ‘वर्कआॅर्डर’
जिल्हा परिषद उपाध्यक्ष नयना गावित यांनी पाणीपुरवठा विभागाच्या कारभाराविषयी तीव्र संताप व्यक्त केला. आपल्या गटातील पाण्याच्या टाकीचे काम करताना पाणीपुरवठा विभागाने आपणाला विश्वासात घेतले नाहीच शिवाय ज्या ठेकेदारावर गुन्हा दाखल झाला आहे त्याला काम न देण्याचे सांगूनही त्यालाच काम कसे देण्यात आले? असा प्रश्न उपस्थित केला. विशेष म्हणजे सर्वप्रक्रिया होऊन संबंधितास वर्कआॅर्डरदेखील देण्यात आल्याने यामध्ये काहीतरी आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. यावेळी हिरामण खोसकर, नितीन पवार यांनी आदिवासी उपाध्यक्षांवर अन्याय होत असल्याची भूमिका घेतली. गावित यांनी पाणीपुरवठा विभागाचे गावित यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला, मात्र त्यांना उत्तर देता आले नाही.
यावेळी कंत्राटाबाबत अभ्यास करून पुनर्विचार करण्याचा निर्णय घेण्यात आला.
बोगस बिले तयार करून त्या माध्यमातून मोठा भ्रष्टाचार होत असल्याने या सर्व प्रकारणाची चौकशी करण्याची मागणीही अश्विनी अहेर यांनी केली. गेल्या पंधरा वर्षांपासून तालुका वैद्यकीय अधिकारी एकाच ठिकाणी असल्यामुळे येथील बेबंद कारभार सुरूच आहे. त्यामुळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र चालवायचेच नाही अशी अधिकाºयांची मानसिकता आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.

Web Title: Aher has organized Mandla chaos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.