स्मार्ट ग्राम योजनेत आहेरगाव ग्रामपंचायत प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 05:08 PM2021-07-17T17:08:01+5:302021-07-17T17:11:38+5:30

पिंपळगाव बसवंत : शासनाच्या ग्रामविकास विभागाच्यावतीने स्मार्ट ग्राम योजनेत सहभागी होऊन निकष पूर्ण करणाऱ्या गावांना पुरस्कार देण्याची योजना आहे. या योजनेत तालुकास्तरावर आहेरगाव ग्रामपंचायत पात्र ठरली असून आता जिल्हस्तरीय स्मार्ट ग्राम कमिटीच्यावतीनेदेखील ग्रामपंचायतची तपासणी करण्यात आली. त्यातदेखील जिल्हा कमिटीने समाधान व्यक्त केले आहे. याप्रसंगी जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी रवींद्र परदेशी, निफाडचे गट विकास अधिकारी संदीप कराड, विस्तार अधिकारी सुहास शिंदे, सोनवणे, के.टी. गादड यांनी या ग्राम कमिटीत सहभागी होते.

Ahergaon Gram Panchayat first in smart village scheme | स्मार्ट ग्राम योजनेत आहेरगाव ग्रामपंचायत प्रथम

आहेरगाव ग्रामपंचायतीची पाहणी करताना जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, समवेत इतर पदाधिकारी.

googlenewsNext
ठळक मुद्देआहेरगाव हे गाव निफाड तालुक्यात नेहमी चर्चेत असणारे गाव आहे.

पिंपळगाव बसवंत : शासनाच्या ग्रामविकास विभागाच्यावतीने स्मार्ट ग्राम योजनेत सहभागी होऊन निकष पूर्ण करणाऱ्या गावांना पुरस्कार देण्याची योजना आहे. या योजनेत तालुकास्तरावर आहेरगाव ग्रामपंचायत पात्र ठरली असून आता जिल्हस्तरीय स्मार्ट ग्राम कमिटीच्यावतीनेदेखील ग्रामपंचायतची तपासणी करण्यात आली. त्यातदेखील जिल्हा कमिटीने समाधान व्यक्त केले आहे.
याप्रसंगी जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी रवींद्र परदेशी, निफाडचे गट विकास अधिकारी संदीप कराड, विस्तार अधिकारी सुहास शिंदे, सोनवणे, के.टी. गादड यांनी या ग्राम कमिटीत सहभागी होते.
आहेरगाव हे गाव निफाड तालुक्यात नेहमी चर्चेत असणारे गाव आहे. अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या शासनाच्या निर्मल ग्राम, स्वछ ग्राम, आदर्श गाव, साने गुरुजी स्वच्छ शाळा, बचत गट स्थापन करून रोजगार निर्मिती आदीसह अनेक शासनाच्या योजनेत भाग घेतला आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या स्मार्ट ग्राम योजनेत सहभागी होणाऱ्या गावांना स्वच्छता, व्यवस्थापन, दायित्व, अपारंपरिक ऊर्जा, पर्यावरण, पारदर्शकता व तंत्रज्ञानाचा वापर हे निकष आहेत. यावेळी आहेरगावच्या सरपंच संगीता शिंदे, उपसरपंच रामकृष्ण शिंदे, रामभाऊ तात्या माळोदे संचालक कृउबास ग्रामपंचायत सदस्य काशिनाथ मोरे, कृष्णा रसाळ, बाळासाहेब गांगुर्डे, गणेश निकम, लता रसाळ, धनश्री गवळी, मनीषा मोरे, जनाबाई जाधव, स्वाती बागुल, रामराव रसाळ, सुरेश शिंदे, भालचंद्र तरवारे, संदीप पाटील आदी उपस्थित होते.

कमिटीकडून समाधान
या निकषात जास्तीत जास्त गुण मिळविणाऱ्या गावांना तालुक्यात प्रथम येणाऱ्या १० लाख रुपये पुरस्काराची योजना आहे. त्यात निफाड तालुक्यात आहेरगाव ग्रामपंचायत प्रथम क्रमांक म्हणून पात्र ठरली असून जिल्ह्यातील १५ ग्रामपंचायतमध्ये आहेरगाव ग्रामपंचायतचा समावेश झाला होता आणि आता जिल्हास्तरीय स्मार्ट ग्राम कमिटीने पाहणी करून समाधान व्यक्त केले आहे.

 

 

Web Title: Ahergaon Gram Panchayat first in smart village scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.