अहिल्यादेवी होळकर यांना विविध संघटनांच्या वतीने अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 12:09 AM2018-06-02T00:09:07+5:302018-06-02T00:09:07+5:30

येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट मुक्त विद्यापीठात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले.

 Ahilyadevi Holkar greeted on behalf of various organizations | अहिल्यादेवी होळकर यांना विविध संघटनांच्या वतीने अभिवादन

अहिल्यादेवी होळकर यांना विविध संघटनांच्या वतीने अभिवादन

googlenewsNext

नाशिक : येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट मुक्त विद्यापीठात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु ई. वायुनंदन होते. त्यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांनी प्रास्तविक केले. यावेळी विद्यापीठाचे उपकुलसचिव विवेक ओक, उत्तम जाधव यांच्यासह विविध विद्याशाखांचे संचालक, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
भैरवनाथ सेवाभावी संस्था
देवळाली कॅम्प येथील भैरवनाथ महिला सेवाभावी संस्था व शिवसेनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्र मात प्रा. सुनीता आडके यांचे व्याख्यान झाले. याप्रसंगी नगरसेविका आशा गोडसे यांनी अहिल्यादेवींच्या जीवनावर प्रकाशझोत टाकला. कार्यक्र मास विजय निकम, राजू खैरनार, विलास गोडसे, सुभाष भांड, काशीनाथ पाबळे, हरिभाऊ तागड, माधव गोडसे, खंडेराव मेढे, चंद्रकांत गोडसे, योगीता तागड, ज्योती पाबळे, रंजना पाबळे, साधना तागड आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन गणेश देवकर, तर आभार अनिल पाबळे यांनी मानले.  अहिल्यामाता होळकर यांच्या जयंतीनिमित्त दुर्गा उद्यान येथील पुतळ्यास मनपाच्या वतीने प्रभाग सभापती पंडित आवारे, मनपा विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
राष्ट्रवादीतर्फे अभिवादन
नाशिक शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी शहराध्यक्ष रंजन ठाकरे, महिला कार्याध्यक्षा सुषमा पगारे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी आमदार जयवंत जाधव यांनी आपल्या मनोगतातून अहिल्यादेवींच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. प्रदेश सरचिटणीस नानासाहेब महाले यांनीही मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी अंबादास खैरे, संजय खैरनार, संजय बोडके, मनोहर कोरडे, शंकर मोकळ, भारत जाधव, बाळासाहेब गिते, मकरंद सोमशी, महेश भामरे, प्रफुल्ल पाटील, अरविंद सोनवणे, किरण मानके, डॉ. संदीप चव्हाण, रामलाल साखरे, सुनील घुगे, अक्षय कहांडळ, अक्षय अनवट, किरण जगझाप, किरण फडोळ, संकेत शिंदे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title:  Ahilyadevi Holkar greeted on behalf of various organizations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक