अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 12:23 AM2019-06-01T00:23:26+5:302019-06-01T00:23:58+5:30
क्रांतिकारी राज्यकर्त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी सिडको परिसरातील रायगड चौक येथील अहिल्यादेवींच्या पूर्णाकृती पुतळ्यास माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
सिडको : क्रांतिकारी राज्यकर्त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी सिडको परिसरातील रायगड चौक येथील अहिल्यादेवींच्या पूर्णाकृती पुतळ्यास माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी डॉ. हिरे, धनंजय बुचडे व संतोष हरगोडे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी रामदास लावरे, किरण थोरात, भीमराव पाबळे, बापूराव भिसे, सचिन सातपुते, साहेबराव हलवर, वैभव ढोणे, रामदास सांगावे, रामदास धायगोडे, बी. एम. पवार, दत्तात्रय मदने, राजेंद्र शिंदे, योगेश दुकळे, शकुंतला बुचडे, कुसुम ढोणे, शुभांगी सांगवे, किरण शिंदे, जिभाऊ बच्छाव, दिलीप तुपे, मांगीलाल महाले, देवरे मामा आदी उपस्थित होते.
भाजपा सिडको मंडल
भाजप सिडको मंडलाच्या वतीने महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्ताने रायगड चौक येथील पुतळ्यास आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करु न अभिवादन करण्यात आले. यावेळी नगरसेवक छाया देवांग, भाग्यश्री ढोमसे, नीलेश ठाकरे, भाजपाचे माजी मंडल अध्यक्ष जगन पाटील, यशवंत नेरकर, प्रकाश अमृतकर, शिवाजी बरके, प्रवीण सोनवणे, रवि पाटील, अविनाश पाटील, दिनेश मोडक, रामदास पाटील, नवनाथ पारखे, राहुल गणोरे, प्रशांत कोतकर, दिलीप देवांग, गणेश ठाकूर, परमानंद पाटील, मयूर लवटे, संजय सोनजे आदी उपस्थित होते.
पेठे विद्यालयात जयंती साजरी
पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांची जयंती पेठे विद्यालयात साजरी करण्यात आली. अहल्यादेवी यांच्या प्रतिमेचे पूजन उपाध्यक्ष चंद्रशेखर मोंढे, सचिव दिलीप अहिरे, मुख्याध्यापक लक्ष्मण जाधव, उपमुख्याध्यापक एकनाथ कडाळे, शैलेश पाटोळे, के. डी. चौधरी आदींच्या हस्ते करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष प्रा. सूर्यकांत रहाळकर यांनी अहल्यादेवी यांच्या कार्याची माहिती दिली़ भारतीय जलसंस्कृती मंडळ नाशिक शाखेच्या वतीने आयोजित कार्यक्रमातही अहल्यादेवी यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास पर्यवेक्षक कुंदा जोशी, विनय परदेशी, प्रभाकर बच्छाव, शोभा शेख, गंगाधर बदादे यांच्यासह मंडळाचे सदस्य उपस्थित होते. सूत्रसंचालन दिलीप अहिरे यांनी, तर एकनाथ कडाळे यांनी आभार मानले.