अहिराणी भाषा, खान्देशी संस्कृती श्रेष्ठ - देसाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 12:47 AM2018-05-24T00:47:09+5:302018-05-24T00:47:09+5:30
अहिराणी भाषेमध्ये नवरा-बायको या शब्दाला शब्दच नसून लग्न होताच तू माझा राम व मी तुझी सीता असे म्हटले जाते. त्यामुळे खान्देश संस्कृती श्रेष्ठ असल्याचे प्रतिपादन उत्तर महाराष्टÑ विद्यापीठ भाषा व संशोधन पूर्व विभाग प्रमुख डॉ. बापूराव देसाई यांनी केले.
नाशिकरोड : अहिराणी भाषेमध्ये नवरा-बायको या शब्दाला शब्दच नसून लग्न होताच तू माझा राम व मी तुझी सीता असे म्हटले जाते. त्यामुळे खान्देश संस्कृती श्रेष्ठ असल्याचे प्रतिपादन उत्तर महाराष्टÑ विद्यापीठ भाषा व संशोधन पूर्व विभाग प्रमुख डॉ. बापूराव देसाई यांनी केले. दत्तमंदिररोड लायन्स क्लब हॉल येथे श्री गजानन ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आयोजित वसंत व्याख्यानमालेत ‘खान्देश संस्कृती : जगातील श्रेष्ठ संस्कृती’ या विषयावरील सातवे पुष्प गुंफताना डॉ. देसाई म्हणाले की, अहिराणी भाषेचा शब्दकोष हा जगातील सर्व भाषांपेक्षा मोठा शब्दकोष आहे. खान्देशात वैश्विक एकता मोठी असून, अहिराणी भाषेची शब्दसंपदा, म्हणी, वाक्प्रचार, उखाणे, नाव घेणे, लग्नातील गाणी, सण-उत्सवामधील लोकगीते ही जगातील सर्व भाषांपेक्षा सरस आहेत. खान्देशातील प्रत्येक गावामध्ये मरीमाय-म्हसोबा मंदिर एकत्र आहे. सध्या पाश्चात्य संस्कृतीतून जी लिव्ह रिलेशनशीप फोफावत आहे ती मूळ संकल्पना खान्देशातली असल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले. अंत्यविधी प्रसंगी खान्देशामध्ये महिला शोकगीत रडत रडत म्हणतात. खान्देशात उकिरड्याला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. अमावास्या-पौर्णिमेला उकिरड्याची पूजा करून दिवा लावला जातो. यावेळी देसाई यांनी अहिराणी भाषेतील विविध म्हणी, वाक्प्रचार, उखाणे, गीते सादर करून खान्देश संस्कृतीचे महत्त्व पटवून सांगितले. आजचे व्याख्यान , वक्ते : हभप भास्करबुवा डावखर , विषय : सद्गुरुचे माहात्म्य