खान्देश साहित्य संघातर्फे उद्या अहिराणी कविसंमेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 01:18 AM2019-12-14T01:18:53+5:302019-12-14T01:19:49+5:30
महाराष्ट्र राज्य खान्देश साहित्य संघ नाशिक शाखेच्या वतीने रविवार (दि.१५) रोजी अहिराणी कवी संमेलनाचे आयोजन केले आहे.
सिडको : महाराष्ट्र राज्य खान्देश साहित्य संघ नाशिक शाखेच्या वतीने रविवार (दि.१५) रोजी अहिराणी कवी संमेलनाचे आयोजन केले आहे.
सिंहस्थनगर येथील कवी नारायण सुर्वे वाचनालयात होणाऱ्या या संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ साहित्यिक प्रा. चत्रभुज पाटील हे भूषविणार आहेत. उद्घाटक म्हणून मुंबई येथील राजेंद्र गोसावी तर स्वागताध्यक्षाची धुरा सुदाम महाजन सांभाळणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून प्रा. सदाशिव सुर्यवंशी अहिराणी गीतकार विश्राम बिरारी, बापूसाहेब पिंगळे, मोहनदास भामरे, डॉ. एस. के. पाटील, नाना महाजन, सुरेश पाटील, लतिका चौधरी, डॉ. निता सोनवणे, प्रा. शिवाजी साळंखे, डॉ.कृष्णाभाई पटेल, अनिल राजपुत व विजय चव्हाण हे उपस्थित राहणार आहेत. सकाळच्या सत्रात साहित्यिक बापूसाहेब हाटकर यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार असून दुपारच्या सत्रात खान्देश व राज्यभरातील मान्यवर तसेच
नवोदित कवींचे अहिराणी कवी संमेलन होणार असल्याची माहितीही खान्देश साहित्य संघ नाशिक शाखेच्या अध्यक्ष सौ. सुनिता पाटील यांनी दिली.
यांचा होणार गौरव...
या संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक राजाभाऊ कुलकर्णी (धुळे), कृष्णा पाटील (जळगांव), सुनंदा वैद्य, प्रभा बैकर (धुळे), प्रा. किसन पाटील, वा.ना. आंधळे (जळगांव), प्रा. तानसेन जगताप (चाळीसगांव), रामदास वाघ (धुळे), डॉ. रमेश सूर्यवंशी (औरंगाबाद), कमलाकर देसले (झोडगे) यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.