राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात अहिरे विद्यालयाचे यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2020 04:23 PM2020-03-05T16:23:55+5:302020-03-05T16:24:23+5:30
बागलाण तालुक्यातील मविप्र समाज संस्था नाशिक संचालित श्रीराम सजन अहिरे नूतन इंग्लिश स्कूल, अभिनव बाल विकास मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, ब्राम्हणगाव येथील विद्यार्थ्यांनी राज्यस्तीय विज्ञान प्रदर्शन स्पर्धेत यश पटकावले आहे.
ब्राम्हणगाव: बागलाण तालुक्यातील मविप्र समाज संस्था नाशिक संचालित श्रीराम सजन अहिरे नूतन इंग्लिश स्कूल, अभिनव बाल विकास मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, ब्राम्हणगाव येथील विद्यार्थ्यांनी राज्यस्तीय विज्ञान प्रदर्शन स्पर्धेत यश पटकावले आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,नवी दिल्ली, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, राज्य विज्ञान प्रशिक्षण संस्था (प्रादेशिक विद्या प्राधिकरण) नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानेराज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन आत्मा मालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरु कूल कोकमठाण जि. अहमदनगर येथे पार पडले. या प्रदर्शनात ब्राम्हणगांव विद्यालयाने प्राथमिक विभागात ’आधुनिक सुरक्षित गाडी’ या उपकरणाचे सादरीकरन केले. त्यास द्वितीय क्र मांक मिळाला व राष्ट्रीय स्तरावर निवड झाली. संस्थेचे अध्यक्ष तुषार शेवाळे, सरचिटणीस नीलिमा पवार, उपसभापती राघो अहिरे, बागलाण तालुका सदस्य डॉ. प्रशांत देवरे, मालेगाव तालुका सदस्य डॉ. जयंत पवार, प्रा.के. एन. अहिरे, अरूण अहिरे, दिलीप अहिरे, रत्नाकर अहिरे, प्राचार्य आर. डी.पवार, पर्यवेक्षिका बी. एच. बागुल यांनी सहभागी विद्यार्थी पल्लवी डांगळ, प्रियंका बिरारी तसेच मार्गदर्शक सचिन शेवाळे यांचा सत्कार केला. यावेळी प्रकाश चव्हाण, प्रकाश गांगुर्डे, केशव शिरसाठ, जयवंत पाकळे ,दिगंबर पाटील, रमाकांत भामरे, उत्तम खरे, कैलास माळी, महेंद्र बैरागी, एकनाथ पवार, सचिन शेवाळे, सचिन कापडणीस, किशोर देवरे आदी उपस्थित होते .