अहवा-मालेगाव-औरंगाबाद मार्ग होणार राष्ट्रीय महामार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 12:12 AM2018-03-26T00:12:36+5:302018-03-26T00:12:36+5:30

बागलाण व मालेगाव तालुक्यातून जाणारा अहवा-ताहाराबाद-नामपूर-मालेगाव-औरंगाबाद हा राज्य मार्ग विकसित करण्याच्या दृष्टीने या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा प्राप्त होणे आवश्यक आहे. त्यासाठी हा मार्ग केंद्राकडे प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती संरक्षण राज्यमंत्री तथा धुळ्याचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी दिली.

 Ahwa-Malegaon-Aurangabad route will be going through the national highway | अहवा-मालेगाव-औरंगाबाद मार्ग होणार राष्ट्रीय महामार्ग

अहवा-मालेगाव-औरंगाबाद मार्ग होणार राष्ट्रीय महामार्ग

googlenewsNext

सटाणा : बागलाण व मालेगाव तालुक्यातून जाणारा अहवा-ताहाराबाद-नामपूर-मालेगाव-औरंगाबाद हा राज्य मार्ग विकसित करण्याच्या दृष्टीने या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा प्राप्त होणे आवश्यक आहे. त्यासाठी हा मार्ग केंद्राकडे प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती संरक्षण राज्यमंत्री तथा धुळ्याचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी दिली. दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासूनचा रस्ताकामांचा अनुशेष भरून काढण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात छत्तीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे सांगितले. बागलाण तालुक्यातून जाणाऱ्या विंचूर-प्रकाशा राज्यमार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा प्राप्त करून साक्र ी ते शिर्डी हा नवा मार्ग तयार होणार आहे. या रस्त्याच्या कामासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, काम हाती घेण्यात येणार आहे.  अजमीर सौंदाणे-वायगाव रस्त्यावरील पुलाच्या कामासाठी ५० लाख रुपये, अहवा-ताहाराबाद-नामपूर-लखमापूर या रस्त्यासाठी ९ कोटी ८ लाख रुपये, मानूर-साल्हेर-अलियाबाद या रस्त्यासाठी ९० लाख, सटाणा-अजमीर सौंदाणे-वायगाव-रावळगाव रस्त्यासाठी १ कोटी ७५ लाख, काठरे दिगर-डांगसौंदाणे-सटाणा-मालेगाव-चाळीसगाव या रस्त्यासाठी १ कोटी ५० लाख, नंदुरबार -साक्री-नामपूर-मालेगाव रस्त्यावरील स्लेब ड्रेन बांधकामासाठी ८० लाख, डांगसौंदाणे-सटाणा रस्त्यावरील पुलाच्या कामासाठी १ कोटी रुपये, अहवा-ताहाराबाद-नामपूर रस्त्या- वरील पुलाच्या कामासाठी ७५ लाख, मानूर-साल्हेर-अलियाबाद रस्त्यावरील पुलाच्या कामासाठी १ कोटी रुपये, मेशी - महालपाटणे - ब्राह्मणगाव - अजमीर सौंदाणे-कºहे या रस्त्याच्या कामासाठी २ कोटी ९० लाख रुपये, उत्राणे - आसखेडा - आनंदपूर -आखतवाडे - करंजाड, मुंगसे या रस्त्यासाठी १ कोटी ४५ लाख, पिंपळदर ङ्क्ततिळवण - कंधाणे -केरसाणे-मुंगसे-मुल्हेर या रस्त्यासाठी २ कोटी चाळीस लाख, आराई-वासोळ रस्ता, मुळाणे-दोधेश्वर-कोळीपाडा ङ्क्तकोटबेल-गोराणे-जायखेडा व चिराई-महड-कजवाडे-चिंचवे-गाळणे-डोंगराळे या तीन कामांसाठी ४ कोटी ५० लाख रुपयांची तरतूद करून समाविष्ट करण्यात आले आहेत.
बिगर आदिवासी क्षेत्रातील रस्त्यांच्या कामांचा अनुशेष भरून काढण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात सुमारे छत्तीस कोटी रु पयांची तरतूद केली आहे. त्यामध्ये साक्र ी-नामपूर-मालेगाव या रस्त्याच्या कामासाठी ४ कोटी २५ लाख रु पयांची तरतूद केली आहे. अहवा-ताहाराबाद-नामपूर-उमराणे या रस्त्याच्या कामासाठी ३ कोटी ३० लाख रु पयांची तरतूद केली आहे.
वाहतुकीची मोठी समस्या दूर होणार असल्याचे स्पष्ट करून डॉ. भामरे यांनी सटाणा-मालेगाव, लखमापूर ते नामपूर, नामपूर ते साक्र ी, सटाणा ते दोधेश्वर, सटाणा ते डांगसौंदाणे, वाघळे ते हिंदळबारी घाट कटिंग, साल्हेर घाट कटिंग, मुंजवाड ते निरपूर, चौगाव फाटा ते भाक्षी वनोली आदी दीडशे कोटी रु पयांची कामे करून तालुक्यातील रस्त्यांचे जाळे मजबूत करण्याचे काम केल्याचे सांगितले.

Web Title:  Ahwa-Malegaon-Aurangabad route will be going through the national highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.