मालेगाव तालुक्यात एक लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पीक लागवडीचे उद्दिष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2020 09:12 PM2020-06-09T21:12:15+5:302020-06-10T00:14:17+5:30
मालेगाव : तालुक्यात खरीप पीक लागवडीची लगबग सुरू झाली आहे. शेतकरी खरीप हंगामाच्या पेरणीपूर्व मशागतीची अंतिम तयारी करीत आहेत. येथील कृषी विभागाने एक लाख पाच हजार सहाशे बहात्तर हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचे उद्दिष्ट ठेवले आहे.
मालेगाव : तालुक्यात खरीप पीक लागवडीची लगबग सुरू झाली आहे. शेतकरी खरीप हंगामाच्या पेरणीपूर्व मशागतीची अंतिम तयारी करीत आहेत. येथील कृषी विभागाने एक लाख पाच हजार सहाशे बहात्तर हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचे उद्दिष्ट ठेवले आहे. गेल्या वर्षी शेतकऱ्यांना समाधानकारक उत्पन्न मिळाले होते. खरिपाची कसर रब्बी हंगामात भरून निघाली होती; मात्र कोरोनामुळे उत्पादित झालेल्या शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळाला नाही. शेतीमाल कवडीमोल दराने विक्री करण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढावली. यात नगदी पीक समजल्या जाणाºया ३५ हजार हेक्टर क्षेत्रावर मका पिकाची लागवड केली जाणार आहे. यंदा मक्याची सर्वाधिक लागवड केली जाण्याची शक्यता आहे. त्याखालोखाल २८ हजार हेक्टर क्षेत्रावर बाजरी पिकाची तर पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणाºया कपाशीची १९ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड केली जाणार आहे. तूर, मूग, उडीद आदी पिकांची २६०० हेक्टर क्षेत्रावर तर भुईमूग २ हजार, ज्वारी ५०० हेक्टर क्षेत्रावर लागवड केली जाणार आहे. यासाठी विशेष भरारी पथकांची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी अशोक पवार यांनी दिली आहे.
--------------------------------
कारवाईचा इशारा
शेतकºयांना लागणाºया रासायनिक खतांची मेट्रिक टनमध्ये मागणी नोंदविण्यात आली आहे. शेतकºयांना चढ्या दराने बी-बियाणे व रासायनिक खते विक्री करणाºयांवर धडक कारवाई केली जाणार आहे.
-------------------
खरिपापूर्वीची मशागत अंतिम टप्प्यात
लॉकडाऊनमुळे डाळिंंब व इतर फळे मातीमोल दरात विकावी लागली. शेतीवरही विपरीत परिणाम झाला; मात्र शेतकºयांनी आशा सोडली नाही. वेगवेगळ्या पद्धतीने आर्थिक भांडवल उपलब्ध करून खरीप पेरणीपूर्व मशागत सुरू केली आहे. सध्या मशागत अंतिम टप्प्यात आली आहे. शेतकºयांनी खरिपासाठी लागणाºया बी-बियाणे, रासायनिक खते खरेदीसाठी तयारी केली आहे. अनलॉकमुळे कृषी सेवा केंद्रे सुरू झाली आहेत.
----------------------
शेतकºयांची गर्दी
कृषी केंद्रांवर शेतकºयांची गर्दी दिसून येत आहे. येथील कृषी विभागानेही उद्दिष्टे निश्चित केली आहेत. तालुक्यातील पेरणी लागवडयोग्य ८५ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचे उद्दिष्ट ठेवले आहे.