आयमा अध्यक्षपदासाठी चुरशीची लढत; आज मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 12:25 AM2018-05-29T00:25:33+5:302018-05-29T00:25:33+5:30
उद्योजकांचे नेतृत्व करणाऱ्या अंबड इंडस्ट्रिज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा)च्या निवडणुकीत २६ पैकी २५ जागा या बिनविरोध झाल्या असून, अध्यक्षपदाच्या एका जागेसाठी मंगळवारी सकाळी ७ ते सायंकाळी ५ यावेळेत मतदान होणार आहे.
सिडको : उद्योजकांचे नेतृत्व करणाऱ्या अंबड इंडस्ट्रिज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा)च्या निवडणुकीत २६ पैकी २५ जागा या बिनविरोध झाल्या असून, अध्यक्षपदाच्या एका जागेसाठी मंगळवारी सकाळी ७ ते सायंकाळी ५ यावेळेत मतदान होणार आहे. निवडणुकीत दोन्ही गटांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप झाले असून, सत्ताधारी एकता पॅनलचे उमेदवार वरुण तलवार व विरोधी एकता पॅनलेचे उमेदवार तुषार चव्हाण यापैकी कोणाच्या गळात अध्यक्षपदाची माळ पडणार याचे भवितव्य सुमारे १५०० सभासद ठरविणार आहेत. आयमा निवडणुकीत २६ पैकी २५ जागा बिनविरोध झाल्या असून, अध्यक्षपदाच्या एका पदासाठी होत असलेल्या निवडणुकीत मंगळवारी आयमा हाउस येथे सकाळी ७ ते सायंकाळी ५ या वेळात मतदान होणार आहे. यासाठीची संपूर्ण तयारी पूर्ण झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाºयांनी सांगितले. आयमा या संस्थेच्या माजी अध्यक्षांनी मागील निवडणुकीप्रमाणे यंदाची निवडणूकदेखील बिनविरोध व्हावी यासाठी दोन्ही पॅनलच्या गटांची बैठक घेत समझोता करण्याचा प्रयत्न केला, परंतु यास यश न आल्याने अखेरीस निवडणूक घेण्यात आली. दोन्ही गटांकडून प्रचारास अखेरच्या दिवसापर्यंत भर उन्हात मतदारांची प्रत्यक्ष भेट घेण्यासाठी धावपळ केल्याचे चित्र बघावयास मिळाले असल्याने यंदाची निवडणूक अत्यंत अटीतटीची व चुरशीची बघावयास मिळली. दोन्ही पॅनलमधील उमेदवार व सभासदांचे दोन्ही गटांशी मैत्रिपूर्ण संबंध असले तरी सदरची निवडणूक ही केवळ मागील निवडणुकीत दिलेला शब्द पाळला नसल्याने होत असल्याचे बोलले जात आहे. सत्ताधारी एकता पॅनलकडून अध्यक्षपदासाठी वरुण तलवार यांना संधी दिली आहे, तर विरोधी गटाच्या एकता पॅनलकडून तुषार चव्हाण हे आपले नशीब आजमावत आहे. मंगळवारी (दि.२९ ) मतदान होणार असून, तुषार चव्हाण व वरुण तलवार यांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार असून, बुधवारी (दि.३०) मतमोजणी होऊन या निवडणुकीत विजयी झालेले नूतन अध्यक्ष हे ३१ मे रोजी आयमाच्या सर्वसाधारण वार्षिक बैठकीत पदभार स्वीकारणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकाºयांच्या वतीने सांगण्यात आले.