आयमा  निवडणुक : दोन्ही पॅनलकडून प्रचारास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 12:27 AM2018-05-20T00:27:19+5:302018-05-20T00:27:19+5:30

उद्योजकांचे नेतृत्व करणाऱ्या अंबड इंडस्ट्रियल अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) च्या निवडणुकीत रविवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे. सत्ताधारी एकता पॅनल व विरोधी गटाच्या एकता पॅनलमध्ये माजी अध्यक्षांकडून समझोता करण्याचे असफल झाल्याने निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धुसर झाल्याने दोघा पॅनल निवडणुकीसाठी सज्ज झाले असून, प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे. विरोधी गटाने फक्त अध्यक्षपदासाठी निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली असल्याचे समजते.

 AIMA election: Promotion started from both panels | आयमा  निवडणुक : दोन्ही पॅनलकडून प्रचारास प्रारंभ

आयमा  निवडणुक : दोन्ही पॅनलकडून प्रचारास प्रारंभ

Next

सिडको : उद्योजकांचे नेतृत्व करणाऱ्या अंबड इंडस्ट्रियल अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) च्या निवडणुकीत रविवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे. सत्ताधारी एकता पॅनल व विरोधी गटाच्या एकता पॅनलमध्ये माजी अध्यक्षांकडून समझोता करण्याचे असफल झाल्याने निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धुसर झाल्याने दोघा पॅनल निवडणुकीसाठी सज्ज झाले असून, प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे. विरोधी गटाने फक्त अध्यक्षपदासाठी निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली असल्याचे समजते.आयमा या संस्थेने निवडणूक कार्यक्र म जाहीर झाला असून, येत्या २९ मे रोजी निवडणूक होणार असून, रविवारी (दि.२०) आयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुदत आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच सत्ताधारी एकता पॅनलने उद्योजक वरुण तलवार यांना अध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर केले आहे, तर विरोधी गटाचे अध्यक्ष पदाचे उमेदवार तुषार चव्हाण हे निवडणूक रिंगणात आपले नशीब आजमावत आहे.  दरम्यान, सत्ताधारी एकता पॅनलचे उमेदवार वरुण तलवार विरुद्ध विरोधी गटाकडील एकता पॅनलचे उमेदवार तुषार चव्हाण यांच्यातील लढत म्हणजे एकता विरुद्द एकता अशी लढत होणार आहे. सत्ताधारी एकता पॅनलचे उमेदवार यांनी असोसिएशनच्या निधी संकलन उपक्रमात सहभाग घेतला असून, त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे, तर विरोधी गटाचे उमेदवार तुषार चव्हाण यांनी मागील निवडणुकीत आपल्याला अध्यपदाचा शब्द दिलेला असताना तो पाळला नसल्याचे सांगत सभासदांकडे आपली बाजू मांडत प्रचार करीत आहे. एकूणच निवडणूक चुरशीची होणार असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.
आक्षेप फेटाळला
सत्ताधारी गटाने सर्वांना विश्वासात न घेता उमेदवार जाहीर केल्याने विरोधी गटाचे उमेदवार तुषार चव्हाण व त्याच्या गटाने नाराजी व्यक्त केली. या निवडणुकीत मतदार याद्यांमध्ये ६० सभासदांची नावे ही ऐनवेळी यादीत समाविष्ट आल्याने तुषार चव्हाने गटाकडून राजेंद्र जाधव यांनी यास आक्षेप घेतला. परंतु निवडणूक निर्णय अधिकाºयांनी त्यांचा आक्षेप फेटाळून लावला.

Web Title:  AIMA election: Promotion started from both panels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.