ऐन दिवाळीत शहरातील एटीएममध्ये खडखडाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2019 12:29 AM2019-10-28T00:29:01+5:302019-10-28T00:29:23+5:30
ऐन दिवाळीत बँकांना सलग चार दिवस सुट्टी असताना शहरातील विविध खासगी बँका आणि राष्ट्रीयीकृत बँकांच्या एटीएममध्ये रोकड टंचाई निर्माण झाल्याने एटीएममध्ये खडखडाट झाल्याचे पाहायला मिळत आहे.
नाशिक : ऐन दिवाळीत बँकांना सलग चार दिवस सुट्टी असताना शहरातील विविध खासगी बँका आणि राष्ट्रीयीकृत बँकांच्या एटीएममध्ये रोकड टंचाई निर्माण झाल्याने एटीएममध्ये खडखडाट झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात सरकारी कर्मचाऱ्यांसह अनेक खासगी कंपन्यांच्या
क र्मचाऱ्यांचे बोनस झाले आहेत. मात्र बँकेच्या खात्यावर पैसे असतानाही दिवाळीच्या खरेदीसाठी आणि लक्ष्मीपूजनसाठी एटीएमएममधून पैसे मिळत नसल्याने रोख रकमेची टंचाई निर्माण झाल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात आला.
सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात आॅनलाइन व्यवहारांसह वेगवेगळ््या मोबाइल अॅपचे पर्याय उपलब्ध असले तरी सर्वच ग्राहक आणि व्यावसायिकांना हा पर्याय अवलंबण्यात अडचणी येत असल्यामुळे अनेक ग्राहकांना आर्थिक चणचण भासल्याचे दिसून आले.