रेल्वेस्थानकात हवा शुद्धीकरण यंत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 11:04 PM2019-08-20T23:04:27+5:302019-08-21T01:04:52+5:30
नाशिकरोड रेल्वेस्थानकात हवा शुध्द करणारे एअर प्युरिफायर यंत्र लावण्यात आले असून, उर्वरित दोन यंत्रे लवकरच लावण्यात येणार असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.
नाशिकरोड : नाशिकरोडरेल्वेस्थानकात हवा शुध्द करणारे एअर प्युरिफायर यंत्र लावण्यात आले असून, उर्वरित दोन यंत्रे लवकरच लावण्यात येणार असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.
रेल्वे भुसावळ विभागाचे अधिकारी, एअर प्युरिफायर यंत्र तयार करणाऱ्या पुण्याच्या स्ट्राटा एनव्हायरो कंपनीचे अमोल चाफेकर, रेल्वे स्थानक प्रबंधक आर. के. कुठार, वरिष्ठ वाणिज्य अधिकारी कुंदन महापात्रा, रेल्वे अभियंता एस. जी. सय्यद, विजय तिवडे, इलेक्ट्रीक विभागाचे अजय कुमार आदींनी पाहणी केली होती. नाशिकरोड रेल्वेस्थानकातून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. स्थानकात प्रवेशद्वाराजवळ वाहनांमुळे हवा प्रदूषित होते. तेथे सहा एअर प्युरिफायर यंत्रे लावण्याबरोबर इतर ठिकाणी गरजेनुसार चार ते सात यंत्रे लावण्याचे ठरविण्यात आले होते.
प्रगत देशांत या कंपनीने अशी यंत्रे बसवली असून बंगळुरू, ठाणे, दिल्ली, मुंबई, कोलकाता येथेदेखील लावण्यात आली आहेत. ट्रॅफिक सिग्नल, बस-रेल्वेस्थानक, विमानतळ, टोल नाका, मॉल्स, हॉस्पिटल्स, शाळा, सोसायट्या, पेट्रोलपंप आदी गर्दीच्या ठिकाणी एअर प्युरिफायर लावणे फायद्याचे ठरले आहे. रेल्वेस्टेशनमध्ये सहा ठिकाणी सामाजिक संघटनांच्या मदतीने ती यंत्रे लावली जाणार आहेत. एक ते पाच लाखापर्यंत किंमत असलेले एअर प्युरिफायर मिनिटाला किमान २००० क्यूबिक फूट हवा, धूळ एक मशीन खेचून घेते. नंतर ही धूळ, माती नर्सरींना वापरण्यासाठी देण्यात येते. नाशिकरोड रेल्वेस्थानकाच्या दर्शनी बाजूच्या रिक्षा रॅकच्या दुभाजकावर पहिले एअर प्युरिफायर मशीन बसविण्यात आले आहे.
धूळ खेचणार; प्रवाशांना मिळणार दिलासा
एक ते पाच लाखापर्यंत किंमत असलेले एअर प्युरिफायर मिनिटाला किमान २००० क्यूबिक फूट हवा, धूळ एक मशीन खेचून घेते. नंतर ही धूळ, माती नर्सरींना वापरण्यासाठी देण्यात येते. नाशिकरोड रेल्वेस्थानकाच्या दर्शनी बाजूच्या रिक्षा रॅकच्या दुभाजकावर पहिले एअर प्युरिफायर मशीन बसविण्यात आले आहे.