इगतपुरी नगर परिषदेत बसविले हवा गुणवत्ता तपासणी यंत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:13 AM2021-02-15T04:13:51+5:302021-02-15T04:13:51+5:30
यासाठी शासनाच्या मान्यताप्राप्त प्रयोगशाळेकडून मुख्याधिकारी निर्मला गायकवाड- पेखळे, शहर अभियंता प्रशांत जुन्नरे ,आरोग्य विभागप्रमुख यशवंत ताठे, शहर समन्वयक ...
यासाठी शासनाच्या मान्यताप्राप्त प्रयोगशाळेकडून
मुख्याधिकारी निर्मला गायकवाड- पेखळे,
शहर अभियंता प्रशांत जुन्नरे ,आरोग्य विभागप्रमुख
यशवंत ताठे, शहर समन्वयक ,अजय सोनवणे, प्रयोगशाळा प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत इगतपुरी नगर परिषद हद्दीतील नगर परिषद कार्यालय , अग्निशमन केंद्र, घनकचरा डेपो अशा तीन ठिकाणी हवेची गुणवत्ता तपासणी यंत्रे बसविण्यात आले.
त्यात शासन निर्देशानुसार शहरातील हवेची गुणवत्ता तपासणी केली असता समाधान कारक अहवाल प्राप्त झाल्याचे मुख्याधिकारी पेखळे यांनी सांगितले. तर नगर परिषद व जनसेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने दर महिन्याच्या १५ तारखेला सायकल रॅली होत असून, तर वायू प्रदूषण कमी करण्यासाठी नॉनमोटराइजड वाहतुकीस प्रोत्साहन मिळत आहे.
शहरात विविध भागांत ग्रीन बेल्ट विकसित करण्याच्या कामास लवकरच सुरुवात होणार आहे असे ही मुख्याधिकारी यांनी सांगितले.
===Photopath===
140221\14nsk_13_14022021_13.jpg
===Caption===
इगतपुरी नगरपरिषद कार्यालयात हवेची गुणवत्ता तपासणी यंत्र बसवताना मुख्याधिकारी निर्मला गायकवाड, प्रशांत जुन्नरे, यशवंत ताठे आदी.