व्यावसायिक प्रतिसादाची हमी असेल तरच विमानसेवा!

By admin | Published: September 9, 2016 01:28 AM2016-09-09T01:28:39+5:302016-09-09T01:28:50+5:30

हेमंत गोडसे : उद्योजकांना केले आवाहन

Air travel only if professional response is guaranteed! | व्यावसायिक प्रतिसादाची हमी असेल तरच विमानसेवा!

व्यावसायिक प्रतिसादाची हमी असेल तरच विमानसेवा!

Next

सातपूर : नाशिक येथून विमानसेवा सुरू व्हावी म्हणून संसदेत प्रश्न उपस्थित केला आहे आणि इच्छुक विमान कंपन्यांशीदेखील चर्चा केली आहे. विमान कंपन्यांना स्थानिक पातळीवर व्यावसायिक प्रतिसादाची हमी मिळाल्यास विमानसेवा सुरू करण्यात येईल. त्यासाठी औद्योगिक संघटनांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन खासदार हेमंत गोडसे यांनी केले आहे.
निमा कार्यालयात आयोजित चर्चासत्रात विमानसेवेबाबत खासदार गोडसे यांनी मोठ्या उद्योगातील अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. ओझर येथून विमानसेवा सुरू करण्याबाबतची प्रक्रि या का थांबली याची माहिती त्यांनी दिली.
विमानसेवा सुरू करण्यासाठी स्थानिक पातळीवर सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्व औद्योगिक संघटनांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. विमान कंपन्यांना किमान ५० हजार पत्रं पुराव्यानिशी पाठविण्यात यावेत. त्यासाठी डाटा गोळा करावा, स्थानिक पातळीवर हमी द्यावी, तरच विमानसेवा सुरू होईल, असा आशावाद निमाचे अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी, माजी अध्यक्ष रमेश वैश्य, रवी वर्मा, मनीष कोठारी, तसेच ज्ञानेश्वर गोपाळे, उदय खरोटे, मंगेश पाटणकर, जे. के. शिंदे, चंद्रा बॅनर्जी, दीपक कोल्हटकर, मनीष रावल, पी. एस. कृष्णा, अनिल सहजे, मंदार पराशरे, श्रीनिवास चकलब्बी, अनिल बाविस्कर, सुजित जोसेफ, प्रशांत कवटे, एम. आर. मल्लीकर, बालचंद्र कोटिपन, बी. एस. गायकवाड, अशोक देशपांडे आदिंनी व्यक्त केला. यावेळी उद्योजक उपस्थित होते.

Web Title: Air travel only if professional response is guaranteed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.