विमानसेवा ‘हवेत’,  नाशिककर जमिनीवरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 12:47 AM2018-03-28T00:47:52+5:302018-03-28T00:47:52+5:30

आम आदमीसाठी सुरू करण्यात आलेली एअर डेक्कनची मुंबई-नाशिक तसेच नाशिक-पुणे सेवा अद्यापही हवेतच असून, आता २८ मार्चनंतरही कंपनी प्रवाशांना बुकिंग देत नसल्याने सेवा अनिश्चित असल्याचे स्पष्ट झाले आहे. कंपनीकडून यासंदर्भात कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती देण्यात आले नसून संकेतस्थळावर मात्र बुकिंगसाठी पुढील एप्रिलपर्यंत तारखा उपलब्ध नसल्याने गोंधळाचे वातावरण आहे.

Aircraft 'air', only on Nashik land! | विमानसेवा ‘हवेत’,  नाशिककर जमिनीवरच!

विमानसेवा ‘हवेत’,  नाशिककर जमिनीवरच!

Next

नाशिक : आम आदमीसाठी सुरू करण्यात आलेली एअर डेक्कनची मुंबई-नाशिक तसेच नाशिक-पुणे सेवा अद्यापही हवेतच असून, आता २८ मार्चनंतरही कंपनी प्रवाशांना बुकिंग देत नसल्याने सेवा अनिश्चित असल्याचे स्पष्ट झाले आहे. कंपनीकडून यासंदर्भात कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती देण्यात आले नसून संकेतस्थळावर मात्र बुकिंगसाठी पुढील एप्रिलपर्यंत तारखा उपलब्ध नसल्याने गोंधळाचे वातावरण आहे. तथापि, परिचलन कारणास्तव कंपनीने काही कालावधी पुरती ही सेवा स्थगित केली  असल्याचे अनधिकृत सूत्रांचे म्हणणे आहे.  गेल्या डिसेंबर महिन्यात सुरू करण्यात आलेली नाशिक-मुंबई आणि नाशिक-पुणे विमानसेवा ही गेल्या आठवड्यापासून स्थगित असून, २७ मार्चपर्यंत ही सेवा स्थगित असल्याचे कंपनीने टष्ट्वीटरवर जाहीर केले होते. परंतु मंगळवारी ही मुदत संपत असतानादेखील ही सेवा सुरू होण्याची कोणतीही शक्यता नाही. कंपनीच्या संकेतस्थळावर एप्रिल महिन्यातही बहुतांशी तारखांना विमानाचे शेड्युल्ड नसल्याचे किंवा सोल्ड आउट असे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे ही सेवा केव्हा सुरू होणार याची कोणतीही माहिती संकेतस्थळावर उपलब्ध नाही त्याच बरोबर अधिकृतरीत्या माहितीही देण्यात आलेली नाही. कंपनीने नाशिकच्या अडचणी आणि माहितीसाठी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याचे भ्रमणध्वनी बंद असून, त्यामुळे या सेवेविषयी उलट सुलट चर्चा सुरू आहेत. कंपनीने डिसेंबर महिन्यात सेवा सुरू केली असली तरी मुळातच मुंबईसाठी पुरेसे प्रवासी मिळत नसल्याने अनेक फ्लाइट रद्द झाल्या आहेत. त्यातच आता पूर्ण सेवाच स्थगित ठेवण्यात आल्याने कंपनीला ही सेवा परवडत नसल्याची चर्चा आहे. तथापि, कंपनीला रिजनल कनेक्टिव्हिटीचे देशभरात एकूण ९० रुट मिळाले आहेत. त्यामुळे विमानांची उपलब्धता तसेच अन्य परिचलन कारणामुळे ही सेवा १४ एप्रिलपर्यंत स्थगित असून १५ तारखेपासून सुरू होणार असल्याची अनधिकृत सूत्रांनी माहिती दिली आहे. अर्थात, कंपनीच्या संकेतस्थळावर मात्र त्याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही.

Web Title: Aircraft 'air', only on Nashik land!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.