विमानसेवेचे १५ एप्रिलपासून पुन्हा ‘उडान’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 01:13 AM2018-03-30T01:13:24+5:302018-03-30T01:13:24+5:30
नाशिक : एअर डेक्कनच्या विमानसेवेचे स्थगित झालेले उडान आता १५ एप्रिलपासून पुन्हा होणार आहे. त्यासाठी कंपनीने अधिकृत माहिती दिल्याचे खासदार हेमंत गोडसे यांनी नमूद केले. कंपनीने पुढील महिन्यात मुंबई- कोल्हापूर आणि पुणे-जळगाव विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने पायलटची अडचण भासत असून, ते उपलब्ध झाल्यानंतर ही सेवा पूर्ववत होणार आहे. दरम्यान, नाशिकहून दुपारी मुंबईला जाण्याचे सध्याचे शेड्युल्ड रद्द करण्यात आले असून, आता ही सेवा पूर्वीप्रमाणेच सकाळी ६ वाजता असणार आहे.
नाशिक : एअर डेक्कनच्या विमानसेवेचे स्थगित झालेले उडान आता १५ एप्रिलपासून पुन्हा होणार आहे. त्यासाठी कंपनीने अधिकृत माहिती दिल्याचे खासदार हेमंत गोडसे यांनी नमूद केले. कंपनीने पुढील महिन्यात मुंबई- कोल्हापूर आणि पुणे-जळगाव विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने पायलटची अडचण भासत असून, ते उपलब्ध झाल्यानंतर ही सेवा पूर्ववत होणार आहे. दरम्यान, नाशिकहून दुपारी मुंबईला जाण्याचे सध्याचे शेड्युल्ड रद्द करण्यात आले असून, आता ही सेवा पूर्वीप्रमाणेच सकाळी ६ वाजता असणार आहे.
नाशिकला एकदा विमानसेवा सुरू झाली की मागे वळायची गरज भासणार नाही, असे सेवेचा आग्रह धरणाऱ्या अनेक व्यावसायिक संघटना आणि लोकप्रतिनिधींचा एअर डेक्कनच्या अनियमित सेवेमुळे मुखभंग झाला. ही सेवा आठ दिवसांसाठी म्हणजे २७ मार्चपर्यंत स्थगित करण्यात आल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर बुधवारपासून (दि. २८) ही सेवा पुन्हा सुरू होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र सुरू झाली नाही. एअर डेक्कनच्या वेबसाइटवरून बुकिंगच घेतले जात नव्हते. तसेच सेवा कधी सुरू होणार याचा उल्लेख नव्हता. तरीही ही सेवा १५ तारखेला सुरू होणार असल्याचे वृत्त ‘लोकमत’नेच दिले होते. ते अखेरीस खरे ठरले. ही सेवा १५ एप्रिलपासून सुरू होईल असे बुधवारी खासदार हेमंत गोडसे यांनी सांगितले. कंपनीने महाराष्टÑात मुंबई- कोल्हापूर तसेच पुणे-जळगाव अशी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे शेड्युल्डची पुनर्रचना करताना अडचणी येत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पायलटची कमतरता, उपलब्ध झालेल्या पायलटचे प्रशिक्षण या सर्व बाबींसाठी कंपनीने दोन आठवड्यांसाठी ही सेवा स्थगित केली होती.
आता ही सेवा पुन्हा पूर्ववत सुरू होईल, असे गोडसे यांनी सांगितले. त्यामुळे सेवेविषयीची निर्माण झालेली अनिश्चितता तूर्तास संपुष्टात आली आहे. त्याचबरोबर आता ही सेवा दुपारऐवजी पुन्हा सकाळचीच असणार आहे. ओझर विमानतळावरून सकाळी ६ वाजता मुंबईसाठी विमान उपलब्ध असेल.नाशिकमधून ही सेवा सुरू झाल्यानंतर मुंबईत अचानक दुपारचा स्लॉट देण्यात आल्याने कंपनीला मिळणारा प्रवाशांचा प्रतिसाद घटला होता. अगदी २५ ते ३० टक्के प्रवासीच मिळत होते. याबाबत मी नागरी उड्डाण मंत्रालयाच्या सचिवांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी पुन्हा सकाळीच स्लॉट उपलब्ध करून दिला आहे.
- हेमंत गोडसे, खासदार१५ एप्रिलपासून पुढेही तरीही बुकिंग नाहीच...एअर डेक्कन कंपनीची स्थगित सेवा १५ एप्रिल रोजी सुरू होणार असल्याचे खासदार हेमंत गोडसे यांनी तातडीने जाहीर केले असले, तरी वेबसाइटवर मात्र यादिवशी सर्व तिकिटे सोल्ड आउट दाखवत असून, पुढील तारखांनाही विमानसेवा उपलब्ध नसल्याचे दाखवत असल्याने प्रवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. वेळापत्रक असे...नाशिकहून मुंबईकडे उड्डाण सकाळी ६ वाजता, मुंबईत पोहोचण्याची वेळ ६.५०.
मुंबईहून उड्डाणाची वेळ सायंकाळी ४.५५, नाशिकमध्ये पोहोचण्याची वेळ ५.४५.
नाशिकहून पुण्याकडे प्रस्थान ६ वाजता, पुण्यात पोहोचण्याची वेळ ६.४५.
पुण्याहून नाशिककडे उड्डाण ७.०५ वाजता, नाशिकमध्ये पोहोचण्याची वेळ ७.४५.