अजमीर सौंदाणे केंद्राची आॅनलाइन शिक्षण परिषद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 11:27 PM2020-07-30T23:27:10+5:302020-07-31T01:30:53+5:30
औंदाणे : कोरोना रोगाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्या तरी शिक्षण मात्र बंद नाही. मुलांच्या शिक्षणाबरोबरच शिक्षकांची शैक्षणिक कामे बंद नाही. शिक्षण विभागाच्या वतीने अजमीर सौंदाणे (ता. बागलाण) केंद्राची शिक्षण परिषद आॅनलाइन माध्यमातून आयोजित करण्यात आली होती. अ
औंदाणे : कोरोना रोगाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्या तरी शिक्षण मात्र बंद नाही. मुलांच्या शिक्षणाबरोबरच शिक्षकांची शैक्षणिक कामे बंद नाही. शिक्षण विभागाच्या वतीने अजमीर सौंदाणे (ता. बागलाण) केंद्राची शिक्षण परिषद आॅनलाइन माध्यमातून आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी शिक्षण विस्तार अधिकारी विजय पगार होते. यावेळी केंद्रप्रमुख डी. जे. काकळीज, शशिकांत शिंदे, तंत्रस्नेही शिक्षक हेमंत महाले यांनी मार्गदर्शन केले.
मुलांना आॅनलाइन शिक्षण पद्धतीने शिक्षक दररोज अध्ययन अध्यापन करत असतात. त्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणींवर चर्चा करण्यात आली. पटनोंदणी, पाठ्यपुस्तक वाटप, शैक्षणिक साहित्य वाटप तसेच विविध योजनांसंदर्भात कारवाई करण्याचे विस्तार अधिकारी पगार यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झणकर यांचा शिक्षकांना प्रेरणा देणारा व काळजी विषयीचा संदेश देणारा व्हिडिओ ऐकविण्यात आला.
यावेळी आॅनलाइन झालेल्या चर्चेत प्रतिभा कापडणीस, धनराज भामरे, भीमराव कापडणीस, संजय भामरे, योगीता पठाडे, नितीन भामरे आदी शिक्षकांनी सहभाग घेतला होता घेतला.