आकांक्षा शिंदेचे राज्यस्तरीय स्पर्धेत यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:14 AM2021-04-07T04:14:22+5:302021-04-07T04:14:22+5:30

या दोघीही नाशिकच्या पंचवटी विभागातील महात्मा गांधी विद्यामंदिर या शैक्षणिक संस्थेच्या औषधनिर्माण - शास्त्र महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. सावित्रीबाई ...

Akanksha Shinde's success in the state level competition | आकांक्षा शिंदेचे राज्यस्तरीय स्पर्धेत यश

आकांक्षा शिंदेचे राज्यस्तरीय स्पर्धेत यश

Next

या दोघीही नाशिकच्या पंचवटी विभागातील महात्मा गांधी विद्यामंदिर या शैक्षणिक संस्थेच्या औषधनिर्माण - शास्त्र महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित स्पर्धेत या दोन विद्यार्थिनींनी सार्वजनिक शौचालयांची देखभाल व दुरुस्ती (विशेषतः महिलांसाठी) या विषयावरील अभिप्राय सादरीकरण केला होता. तीन फेऱ्यांमध्ये झालेल्या स्पर्धेत शेवटच्या फेरीतील दहा स्पर्धकांमधून या दोन विद्यार्थिनींनी सादरीकरण केलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या बाबतीतील माहितीबाबत प्रथम क्रमांकाचे तीन लाख रुपये रकमेचे बक्षीस या पटकावले आहे. या विद्यार्थिनींना प्रा.सुवर्णा कुट्टी यांनी मार्गदर्शन केले. पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.नितीन कळमकर यांच्या हस्ते या बक्षिसाचे पुणे येथे वितरण करण्यात आले. यावेळी उपकुलगुरू डॉ.एन.एस. उमराणी, सेल संचालिका डॉ.अपूर्वा पालकर, महापौर मुख्य माहिती अधिकारी कोमन हे उपस्थित होते.

===Photopath===

060421\06nsk_11_06042021_13.jpg

===Caption===

पुणे विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धेत प्र‌थम क्रमांकाच्या मानकरी ठरलेल्या आकांक्षा शिंदे व सोनाली दरेकर.

Web Title: Akanksha Shinde's success in the state level competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.