आखिल भारतीय आदिवासी सेनेचे पोलीस ठाण्यासमोर निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 06:51 PM2020-12-26T18:51:55+5:302020-12-26T18:53:09+5:30

 इगतपुरी : तालुका व शहरात वाढती बेरोजगारी होत असल्याने इगतपुरीतील प्रविण इंडस्ट्रीत स्थानिकांना नोकरी द्या या मागणीसह प्रलंबीत प्रश्नांसाठी दि.ना.उघाडे यांच्या नेतृत्वात आखिल भारतीय आदिवासी सेनेचे इगतपुरी पोलीस ठाण्यासमोर रास्तारोको वगळता निदर्शने आंदोलन करण्यात आले.

Akhil Bharatiya Adivasi Sena protests in front of the police station | आखिल भारतीय आदिवासी सेनेचे पोलीस ठाण्यासमोर निदर्शने

निवासी नायब तहसिलदार प्रविण गोंडाळे व सहा . पोलीस निरिक्षक दिपक पाटील यांना निवेदन देतांना दि.ना.उघाडे सह कार्यकर्ते.

googlenewsNext
ठळक मुद्देआंदोलन : रास्तारोकोला पोलीसांकडुन विरोध झाल्याने तुर्त स्थगित

 इगतपुरी : तालुका व शहरात वाढती बेरोजगारी होत असल्याने इगतपुरीतील प्रविण इंडस्ट्रीत स्थानिकांना नोकरी द्या या मागणीसह प्रलंबीत प्रश्नांसाठी दि.ना.उघाडे यांच्या नेतृत्वात आखिल भारतीय आदिवासी सेनेचे इगतपुरी पोलीस ठाण्यासमोर रास्तारोको वगळता निदर्शने आंदोलन करण्यात आले.
देशभरात कोरोना संसर्गाची साथ अद्याप गेलेली नसतांना सोशल अंतर व आरोग्याची काळजी पाहता पोलीसांच्या मध्यस्थीने तुर्तास रास्तारोकोला परवानगी न मिळाल्याने शासनाच्या ढिसाळ नियोजनाच्या बाबतीत आंदोलकांनी निषेध करीत निदर्शने आंदोलन करीत घोषणाबाजी करण्यात आली .
कोरोना काळात महागाईत शेतकरी, कष्टकरी सह सर्वसामान्य जनतेवर उपासमारीची व बेरोजगारीची वेळ आली.शासनाकडे अनेक प्रश्न प्रलंबीत असतांना शासन झोपेचे सोंग घेत समाजातील उपेक्षीत घटकांकडे दुर्लक्ष करीत असल्याने देशात आराजकता माजली आहे.अशा फसव्या सरकारला कायमचे हद्दपार करणे गरजेचे आहे.असे मत आदीवासी सेनेचे अध्यक्ष दि.ना.उघाडे यांनी मांडले.
                          या प्रसंगी निवासी नायब तहसिलदार प्रविण गोंडाळे, सहा.पोलीस निरिक्षक दिपक पाटील यांना निवेदन देण्यात आले. 
यावेळी जगन जोशी, नामदेव भडांगे, कारभारी पंडित, व-हे पाटील, नंदा जोशी, तुळशीराम गवळी, पंढरीनाथ गावीत, नागेश तुपे, सोमा आगीवले, बुधा आगीवले, राजु गवळी, रानु पाडळणे, मेघा जाधव, शैला पगारे,  राधाबाई बोंडे, छाया गवळी, रंजना पवार, गिरजाबाई बोंडे, माधुरी बोंडे, मिनाबाई आडोळे, माया जगताप, मंगला पवार, ज्योती दोंदे उपस्थीत होते. सुत्रसंचालन व नियोजन सुनिता गांगुर्डे यांनी केले.

 

Web Title: Akhil Bharatiya Adivasi Sena protests in front of the police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.