प्रलंबित मागण्यांसाठी आखिल भारतीय आदिवासी सेनेची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 10:51 PM2020-10-10T22:51:46+5:302020-10-11T00:39:39+5:30
इगतपुरी : शहरात नागरी आरोग्यासह आदी प्रलंबित प्रश्न तत्काळ सोडविण्यात यावेत, यासाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी इगतपुरी विज वितरण कार्यालयासमोर आखिल भारतीय आदिवासी सेनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष दि . ना . उघाडे यांच्या मार्गदर्शनाखाली निदर्शने करण्यात आली. यानंतर प्रलंबित प्रश्नांचे निवेदन नायब तहसीलदार प्रवीण गोंडाळे यांना दिले.

इगतपुरी तालुका व घाट परिसर तसेच आदिवासी भाग असुन शहरी भागात नगर परिषद विभागाचा हक्काचा एक दवाखाना नाही. नगर परिषदेच्या अनेक शासकीय इमारती व जागा मोकळ्या आहेत पण इच्छाशक्ती व शहर विकासाचे धोरण येथील अधिकारी व लोक प्रतिनिधींना नसल्याने सर्वसामान्य जनता मुलभुत हक्कांपासुन वंचित आहे. तसेच शहरातील जुना मुंबई-आग्रा महामार्गाला अनेक वर्षापासुन खड्डे पडले तडे गेले, याबाबत अधिकारी व प्रशासन अनिभज्ञ पणाचे सोंग घेत दिवस लोटत आहेत. कोरोना महामारीच्या काळात जनतेच्या हाताला काम नाही, कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न असतांना विज वितरण विभागाचे वाढते विज बिलाने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले त्यात शासनाचे मोफत धान्य योजनाचा लाभ गरीब कुटुंबाला केवळ रेशन कार्डच्या रंग भेदामुळे मिळाला नाही आदी प्रलंबित प्रश्नांसाठी निदर्शने करण्यात आली. यावेळी उपनगराध्यक्ष नईम खान, विज वितरण विभागीय अधिकारी पाटील, सहायक पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांना निवेदन दिले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष महादेव गायकवाड, रंगनाथ शिरसाट, जगन्नाथ लंगोटे, संजय लुरे, नगरसेवक संपत डावखर, समीर यादव, सुनीता गांगुर्डे,अनुसया वारघडे, मनीषा घुले, शैला पगारे, छाया गवळी, माया जगताप, कालु खलीफा, सुरेश दोंदे आदी उपस्थित होते.