अस्थि दिव्यांग अंजना ने केले कळसुबाई शिखर सर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 02:52 PM2020-01-03T14:52:51+5:302020-01-03T15:01:23+5:30
स्थि दिव्यांग असलेल्या अंजनाने कळसुबाई शिखर सर करून तिरंगा फडकाविला. तीने ११ वेळा कळसुबाई शिखर सर करण्याचा संकल्प केला आहे.
नाशिक : अस्थि दिव्यांग असलेल्या अंजनाने कळसुबाई शिखर सर करून तिरंगा फडकाविला. तीने ११ वेळा कळसुबाई शिखर सर करण्याचा संकल्प केला आहे. अंजना प्रधान ही मुळता: अस्थि दिव्यांग असून तीला कुबडीचा आधार घ्यावा लागत असतो. तरीही तीने महाराष्टÑातील सर्वांत उंच शिखर सर करुन नवा विक्रम प्रस्तापिक केला आहे.
आपल्या अपंगत्वावर मात अंजनाने आजवर प्यारा ओलिम्पक मध्ये जलतरण स्पर्धेत आज पर्यंत ५ सुवर्ण, ३ रौप्य, २ कास्य पदके प्राप्त केली आहेत. याआधी तीने रामशेज, रायगड, प्रतापगड, सिंहगड, अंजनेरी, ब्रह्मगिरी, अंकाई-टंकाई, ब्राह्मगड, दातेगड, सिंधुदुर्ग आदी किल्यांवर भ्रमंती केली आहे. पैठणच्या शिव उर्जा प्रतिष्ठान सोबत तिने पहिली मोहीम केली. तीच्या सोबत मानसिक दिव्यांग चेतन रत्नपारखी यांनीही या मोहिमेत सहभाग घेतला होता. यावेळी त्यांनी गोदावरी वाचवा व हेल्मेट घाला हे सामाजिक संदेश दिले . ह्या मोहिमेत सांगली , सातारा , औरंगाबाद , पैठण मधून सुमारे ४० दिव्यांगानी यात सहभाग घेतला होता. यासाठी तीला घनश्याम कुवर, शिव उर्जा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजी गाडे , संगीता गाडे ,अमर पवार , निवास पाटील अनिल बिडकर आदींचे सहकार्य लाभले.