नाशिकरांना अक्षय कुमार देणार गुड न्यूज ; मार्शल आर्ट अॅकेडमी, निसरर्गोपचार केद्राचा विचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 01:32 PM2020-07-03T13:32:23+5:302020-07-03T13:40:15+5:30
बॉलीवूडचा सुपर स्टार अक्षय कुमार नाशिककरांना लवकरच गुड न्यूज देणार आहे. अक्षय कुमारने नाशिकमध्ये मार्शल आर्ट अॅकेडमी अथवा निसर्गोपचार केंद्र सुरू करण्याचा विचार केला असून त्यासाठी त्यांनी नाशिकच्या त्र्यंबकेश्वर परिसरात तीन दिवसांपूर्वी जागेची पाहणीही केल्याचे कळते.
नाशिक : बॉलीवूडचा सुपर स्टार अक्षय कुमारनाशिककरांना लवकरच गुड न्यूज देणार आहे. अक्षय कुमारने नाशिकमध्ये मार्शल आर्ट अॅकेडमी अथवा निसर्गोपचार केंद्र सुरू करण्याचा विचार केला असून त्यासाठी त्यांनी तीन दिवसांपूर्वी गोपनीय दौऱ्यात नाशिकच्या त्र्यंबकेश्वर परिसरात तीन दिवसांपूर्वी जागेची पाहणीही केल्याचे कळते.
अक्षय कुमार खासगी हॅलिकॉप्टरने नाशिकला आले होत. येथील सपकाळ नॉलेज हबच्या हेलीपॅडवर त्यांचे आगमन झाल्यानंतर सपकाळ नॉलेज हबचे अध्यक्ष रविंद्र सपकाळ व कल्याणी सपकाळ यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर अक्षय कुमार त्र्यंबकेश्वर परसिरातील ग्रेप काऊंटी येथे रवाना झाले. त्या ठिकाणी त्यांची काही व्यक्तींशी व्यावसायिक चर्चा होणार होती. त्यासाठी अक्षय कुमार यांनी ग्रेप काउंटी येथे मुक्कामही केला. या मुक्कामात त्यांनी त्यांच्या भविष्यातील योजनांविषयी महत्वाच्या बाबींवर विचार केल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली असून त्यांच्या भविष्यातील योजना प्रत्यक्षात आल्या तर नाशिककरांना लवकरच गुड न्यूज मिळण्याची शक्यता आहे. निसर्गाचे वरदान लाभलेल्या नाशिकमध्ये निसर्गोपचार केंद्र अथवा मार्शल आर्ट अॅकेडमी सुरु झाल्यास नाशिकध्ये आरोग्याची व स्वत:ची काळजी घेणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढून त्यातून नाशिकच्या आर्थिक विकासाला चालना मिळण्यास मदत होणार आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वीच सरकारने नाशिकमध्ये चित्रीकरणालाही परवानगी आहे. त्यामुळे अक्षय कुमार त्यांच्या एखाद्या आगामी चित्रपटाच्या तयारी साठी तर नाशिकमध्ये आला नव्हते ना, अशीही चर्चा सुरू आहे. मात्र कोणत्याही कामानिमित्त का होईना अक्षय कुमार नाशिकमध्ये येऊन राहणे ही नाशिककरांसाठी आनंदाचीच बाब आहे. त्याहूनही आनंदाची बाब म्हणजे अक्षय कुमार लवकरच पुन्हा नाशिकला येणार असून त्यावेळी ते नाशिककरांना त्याच्या भविष्यातील योजना प्रत्यक्षात आणण्याविषयी गूड न्यूज देऊ शकतात, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.