अक्षयकुमार देणार झेडपी सदस्यांना हगणदारीमुक्तीचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 12:25 AM2017-08-20T00:25:31+5:302017-08-20T00:25:37+5:30
‘टॉयलेट : एक प्रेमकथा’ : २४ आॅगस्टचा मुहूर्त नाशिक : नाशिक जिल्हा २६ जानेवारी २०१८ पर्यंत हगणदारीमुक्त करण्याचा विडा उचललेल्या जिल्हा परिषदेच्या स्वच्छता विभागाने येत्या २४ आॅगस्ट रोजी सर्व जिल्हा परिषद सदस्य व पदाधिकाºयांना अभिनेता अक्षयकुमारचा नुकताच रिलिज झालेला ‘टॉयलेट : एक प्रेमकथा’ सिनेमा दाखविण्याचा निर्णय घेतला आहे.
‘टॉयलेट : एक प्रेमकथा’ : २४ आॅगस्टचा मुहूर्त
नाशिक : नाशिक जिल्हा २६ जानेवारी २०१८ पर्यंत हगणदारीमुक्त करण्याचा विडा उचललेल्या जिल्हा परिषदेच्या स्वच्छता विभागाने येत्या २४ आॅगस्ट रोजी सर्व जिल्हा परिषद सदस्य व पदाधिकाºयांना अभिनेता अक्षयकुमारचा नुकताच रिलिज झालेला ‘टॉयलेट : एक प्रेमकथा’ सिनेमा दाखविण्याचा निर्णय घेतला आहे.
त्या अनुषंगाने सर्व जिल्हा परिषद सदस्य व पदाधिकाºयांना जिल्हा परिषदेच्या स्वच्छता विभागामार्फत दूरध्वनीने याची कल्पना देण्यात आली आहे. २४ आॅगस्टला दुपारी एक वाजेच्या सिनेमॅक्समध्ये या शोचे लोकप्रतिनिधींसाठी आयोजन करण्यात आले आहे. सद्यस्थितीत तीन तालुके शंभर टक्के हगणदारीमुक्त झाल्याचा दावा करणाºया संबंधित विभागाने संपूर्ण जिल्हा हगणदारीमुक्त होण्यासाठी विविध उपाययोजना आखल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शौचालय उभारण्याविषयी जनजागृती व्हावी, यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, असे प्रयोजन स्वच्छता विभागाने केले आहे. ‘टॉयलेट : एक प्रेमकथा’ राजस्थानमधील एका खेडेगावातील युवक-युवतीची प्रेमकथा असून, अक्षयकुमार याचे अभिनेत्रीवरील व त्यापोटी अभिनेत्रीने शौचालय उभारणीसाठी अक्षयकुमारसह ग्रामस्थांना कसे उद्युक्त केले? याची माहिती चित्रपटात आहे. हा सिनेमा स्वच्छ भारत अभियानाला प्रोत्साहन देत असल्याचे कारण देत तो लोकप्रतिनिधींना दाखविला तर शौचालय उभारणीसाठी अधिक चांगल्या प्रकारे जनजागृती होऊ शकते, असे गृहीत धरून येत्या २४ आॅगस्टला नाशिक जिल्हा परिषदेच्या स्वच्छता विभागाच्या वतीने सर्व ७३ सदस्यांना हा सिनेमा दाखविण्यात येणार असल्याचे समजते. अर्थात सिनेमा दाखविण्यासाठीचा खर्च स्वच्छता विभागाच्या प्रचार व प्रसार खात्यात टाकण्यात येण्याची शक्यता आहे.