सहा गावांत अक्षय प्रकाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 11:50 PM2017-08-02T23:50:20+5:302017-08-03T00:46:15+5:30
पाटोदा : विखरणी येथील विद्युत उपकेंद्रांतून येवला तालुक्यातील सहा गावांत अक्षय प्रकाश सुरू करावी, असे आदेश ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी कुमटेकर याना फोन वरून आदेश दिले. यासंदर्भात मंत्र्यांच्या दालनात गावकºयांचा उपस्थितीत बैठक झाली. आमदार जयंत जाधव यावेळी उपस्थित होते. जाधव यांनी याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.

यावेळी मोहन शेलार , नामदेव पगार, शंकर गायके,अशोक बंदरे यांनी अक्षय प्रकाश योजना सुरू करण्याबाबत चर्चा करून वास्तव परिस्थीती मांडली. वेळोवेळी उपोषण करूनही अधिकारी दाद देत नसल्याची तक्र ार याप्रसंगी मोहन शेलार यांनी ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्याकडे केली. शेती करीत असताना परिसरातील बº्याच शेतकºयांनी रानावनात घरे बांधली आहेत. रात्रीच्या वेळेस वीजप्रवाह खंडित असतांना शेतकº्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. अक्षय प्रकाश योजना अभावी सहा गावे अंधारात आहेत, हे ऐकताच ऊर्जा मंत्री बावनकुळे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी कुमटेकर याना अधिवेशन संपण्या अगोदर अक्षयप्रकाश योजना सुरू करा असा आदेश दिला.
नाशिक भेटीदरम्यान या योजनेचा शुभारंभ मी स्वहस्ते करणार असल्याने उद्याच तात्काळ कामाची सुरु वात करावी असेही ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी सांगितले. गेल्या अनेक महिन्यांपासून विखरणी सह सर्व गावातील ग्रामस्थ आंदोलन करत आहेत, अक्षयप्रकाश सुरू झाल्याशिवाय वीज बिल भरायचे नाही अशा सहा गावांनी ग्रामसभा घेऊन ठराव केला असल्याने कोणीही बिल भरत नव्हते ,दोन महिन्यात अक्षयप्रकाश योजना सुरू करतो असे पत्र वीज वितरण कंपनीचे अधिकारी यांनी आंदोलनकर्त्यांना दिले होत.दोन महिन्यात सदर योजना सुरू न झाल्याने खोटे पत्र दिले म्हणून या अधिकारी वर्गावर मोहन शेलार यांनी गुन्हा दाखल केला आहे.
अक्षयप्रकाश योजना सहा गावांसाठी अतिशय आत्मीयतेचा विषय आहे , आंदोलनाची दखल ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी घेतली, प्रश्न सोडविला, ऊर्जामंत्री म्हणून अभिनंदनाचा दि.१५ आॅगस्टच्या ग्रामसभेत अभिनंदनाचा ठराव करणार आंहोत.
- मोहन शेलार,
गटनेते पंचायत समिती, येवला