‘आली आली घंटागाडी’चा गजर घुमला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:14 AM2021-03-19T04:14:19+5:302021-03-19T04:14:19+5:30
इंदिरानगर : ‘आली आली घंटागाडी’ असे गाणे ध्वनिक्षेपकावर वाजले की घंटागाडी आली याबाबतचे संकेत मिळतात. शिवाय कोरोना संकटापासून ...
इंदिरानगर : ‘आली आली घंटागाडी’ असे गाणे ध्वनिक्षेपकावर वाजले की घंटागाडी आली याबाबतचे संकेत मिळतात. शिवाय कोरोना संकटापासून बचाव करण्यासाठीचा संदेश वाजू लागला तरी परिसरातून घंटागाडी जात असल्याचे कळते; परंतु चार्वाक चौक परिसरात फिरणाऱ्या घंटागाडीवरील गाणे वाजणे बंद झाल्याची बाब ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच, त्याची दखल घेण्यात आल्याने पुन्हा ‘घंटागाडी’चा गजर सुरू झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
कोरोना संसर्ग दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे महापालिकेच्या वतीने जनजागृतीवर भर देण्यात येत आहे. त्यात घरोघरी जाऊन कचरा गोळा करणाऱ्या घंटागाडीवरील ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून नागरिकांना दक्षता घेण्याबाबतची माहिती दिली जाते; परंतु गेल्या दहा दिवसांपासून गणेशनगर, जाखडीनगर, पाटील गार्डन, आत्मविश्वास सोसायटी महारुद्र कॉलनी, अरुणोदय सोसायटी, मानस कॉलनीसह परिसरात फिरणाऱ्या घंटागाडीवरील जनजागृती करणारे ध्वनिक्षेपक बंद झाले होते. त्यामुळे घंटागाडीवरील चालक किंवा कामगार हातात पत्रा घेऊन काठीने वाजत घंटागाडी आल्याचे संकेत देत होते. नागरिकांना हे कळत नसल्याने त्यांची धावपळ होत होती. या ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेऊन तातडीने घंटागाडीवरील ध्वनिक्षेपक सुरू करण्यात आले आहेत.