ंमद्यपींनी तीन दिवसांत रिचवली ४४ हजार लिटर दारू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 09:17 PM2020-05-12T21:17:02+5:302020-05-12T23:23:46+5:30
सायखेडा : शासनाने मद्यविक्रीला परवानगी देताच निफाड, येवला आणि नांदगाव तालुक्यात सुमारे ४४ हजार ६५४ लिटर दारू विक्री झाली असून त्यातून पंचावन्न लाखांवर महसूल वसूल करण्यात आला आहे.
बाजीराव कमानकर ।
सायखेडा : शासनाने मद्यविक्रीला परवानगी देताच निफाड, येवला आणि नांदगाव तालुक्यात सुमारे ४४ हजार ६५४ लिटर दारू विक्री झाली असून त्यातून पंचावन्न लाखांवर महसूल वसूल करण्यात आला आहे.
गेल्या एक- दीड महिन्यांपासून दारू दुकाने बंद असल्याने मद्यपींची पंचाईत झालेली होती. येवला राज्य उत्पादन शुल्क विभागांतर्गत येवला , नांदगाव व निफाड तालुक्यातील सायखेडा, लासलगाव व निफाड पोलीस स्टेशनअंतर्गत असलेल्या दारू दुकानांचा यामध्ये समावेश होत आहे. दि ८, ९ व १० मे रोजी येवला विभातंर्गत देशी मद्य,विदेशी मद्य,बिअर विक्री ४४६५४ हजार लिटर झाली असून शासनाला जवळपास पंचावन्न लाख पन्नास हजार रूपयांचा महसूल प्राप्त झाला तर वाईन विक्र ी तीनशे एकतीस लिटर झाली असून विभागीय आयुक्त अर्जुन मोहोळ,अधीक्षक डॉ मनोहर अंचुळे यांच्या मार्गदर्शनाखाली फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडू नये म्हणून पोलीस ठाण्याची मदत घेण्यात येत आहे.
----------------------
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून दुकानदारांना काटेकोरपणे शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे असे सूचित केले आहे. तसेच ग्राहकांना मद्य देतांना फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे, मास्क लावणे, सनेटाईझर लावणे, थर्मल स्कॅनिंग करून शिस्त पाळली जात आहे का नाही याबाबत देखील पडताळणी केली जात असून कोठेही नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसून आले नाही,तसेच आपत्ती काळात शासनास महसूल प्राप्त करून देण्याची भूमिका राज्य उत्पादन शुल्क विभाग बजावत आहे.
- सचिन श्रीवास्तव, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, येवला