‘अलर्ट सायरन’वरून वाहनचालक-पोलिसांमध्ये ‘खटके’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 12:33 AM2017-12-27T00:33:19+5:302017-12-27T00:33:38+5:30

शहरातील विविध सिग्नलवर बसविण्यात आलेले ‘अलर्ट सायरन’ हे खरे तर वाहनचालकांना इशारा देण्यासाठी आहेत. सायरन वाजताच पादचाºयांना मार्गस्थ होण्यासाठी प्राधान्य द्यावे, वाहने पुढे नेऊ नये, असा सूचक इशरा सायरनमार्फत मिळतो; मात्र सिग्नलवर नेमके याविरुद्ध चित्र बघावयास मिळत असल्याने वाहतूक पोलिसांसोबत वाहनचालकांचे खटके उडत आहेत.

'Alert sirens' driving | ‘अलर्ट सायरन’वरून वाहनचालक-पोलिसांमध्ये ‘खटके’

‘अलर्ट सायरन’वरून वाहनचालक-पोलिसांमध्ये ‘खटके’

Next

नाशिक : शहरातील विविध सिग्नलवर बसविण्यात आलेले ‘अलर्ट सायरन’ हे खरे तर वाहनचालकांना इशारा देण्यासाठी आहेत. सायरन वाजताच पादचाºयांना मार्गस्थ होण्यासाठी प्राधान्य द्यावे, वाहने पुढे नेऊ नये, असा सूचक इशरा सायरनमार्फत मिळतो; मात्र सिग्नलवर नेमके याविरुद्ध चित्र बघावयास मिळत असल्याने वाहतूक पोलिसांसोबत वाहनचालकांचे खटके उडत आहेत.  शहरातील बहुतांश सिग्नलवर ‘अलर्ट सायरन’ बसविले गेले आहेत. सिग्नलचा दिवा लाल झाल्यानंतर अखेरचे काही सेकं द शिल्लक राहताच सायरन वाजतो. या सायरनचा अर्थ म्हणजे पादचारी सिग्नल ओलांडत आहेत, वाहनचालकांनी वाहने सुरू करू नये, असे आहे; मात्र बहुसंख्य वाहनचालकांकडून याबाबत गैरसमज करून घेतला जात असल्याचे चित्र शहरातील सिग्नलवर पाहावयास मिळत आहे. सायरन वाजला म्हणजे सिग्नल सुटला असा अर्थ घेऊन काही दुचाकी-चारचाकी वाहनचालक वाहने पुढे दामटवितात. यावेळी अपघाताचा धोकाही ओढावतो. याबाबत वाहतूक शाखेकडून जनजागृती होणे गरजेचे आहे. सायरनचा आवाज ऐकून लाल दिव्याकडे दुर्लक्ष करत वाहने पुढे नेणाºया वाहनचालकांना संबंधित वाहतूक पोलिसांनी अडविले असता त्यांच्यामध्ये खटके उडून वादविवादाचे प्रकार घडतात. ‘सायरन वाजला तेव्हा आम्ही वाहन पुढे आणले, आम्ही कुठे सिग्नलचा नियम भंग केला’ असे सांगून वाहतूक पोलिसांसोबत वाद घालतात. एकूणच वाहतूक नियमांबाबत असलेली उदासीनता व निरक्षरतेच्या माध्यमातून होणाºया गैरसमजापोटी सदर समस्या उद्भवत आहे. सायरनचा अर्थ समजून घेत वाहनचालकांनी अखेरचे काही सेकंद सिग्नलवर थांबून राहावे आणि सिग्नल ओलांडण्याच्या प्रयत्नात असलेल्या पादचाºयांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन शहर वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे. वाहन सुरू करून पुढे जाण्याचा इशारा सायरन देत नाही, तर तो वाहन थांबविण्याचा आणि आता पादचारी मार्गस्थ होऊ शकतात, असा इशारा देतो. 
सिग्नलचा सूक्ष्म अभ्यास करावा 
चौकांमधील सिग्नलचा अभ्यास नागरिकांनी करणे गरजेचे आहे. सिग्नलवरील सायरन जेव्हा वाजतो तेव्हा सिग्नलचा दिवा हा लालच असतो, तर ज्या बाजूचा सायरन वाजला आहे त्या बाजूला सिग्नल व पादचाºयाचे सांकेतिक चित्र हिरवे होते. याचाच अर्थ पादचाºयांनी रस्ता ओलांडावा जोपर्यंत सायरन वाजत आहे तोपर्यंतच. म्हणजेच वाहनचालकांनी सावध व्हावे, वाहने पुढे आणू नये, पादचाºयांना प्राधान्य द्यावे, असा याचा सरळ अर्थ होतो.

Web Title: 'Alert sirens' driving

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.