पुरोहित एकांकिका स्पर्धेत चांडक कन्या विद्यालयाची ‘सिकंदर’ सर्वोत्कृष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 10:28 PM2019-12-29T22:28:31+5:302019-12-29T22:29:27+5:30
नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित ४२ व्या पुरोहित एकांकिका स्पर्धेत सिकंदर एकांकिका सर्वोत्कृष्ट ठरली. संस्थेच्या १४ माध्यमिक विद्यालयांतील एकांकिकांना मागे टाकत सिन्नरच्या चांडक कन्या विद्यालयाने सर्वोत्कृष्ट एकांकिकेची ढाल पटकावली.
सिन्नर : नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित ४२ व्या पुरोहित एकांकिका स्पर्धेत सिकंदर एकांकिका सर्वोत्कृष्ट ठरली. संस्थेच्या १४ माध्यमिक विद्यालयांतील एकांकिकांना मागे टाकत सिन्नरच्या चांडक कन्या विद्यालयाने सर्वोत्कृष्ट एकांकिकेची ढाल पटकावली.
सिन्नर संकुलातूनही या एकांकिकेने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. संस्थेचा सर्व पदाधिकाऱ्यांकडून शाळेच्या मुख्याध्यापक माधवी पंडित, लेखिका व दिग्दर्शक संयुक्ता कुलकर्णी, सहकार्य करणाºया सर्व शिक्षक व कलाकार विद्यार्थिनींचे कौतुक
केले. संस्थेचा पारितोषिक वितरण सोहळा पुरुषोत्तम इंग्लिश स्कूलमध्ये पार पडला. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. भरत केळकर होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी विद्यार्थी व महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा उपस्थित होते. सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष संजय लोंढे, कार्याध्यक्ष राजेंद्र कलाल, संस्थेचे सचिव अश्विनीकुमार येवला, सहसचिव मयूर कपाटे, प्रसाद कुलकर्णी, ऋ षिकेश पुरोहित, परीक्षक देवेन कापडणीस, सुहास भोसले, अपूर्वा नाईक उपस्थित होते.
एकांकिकेच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
मुख्याध्यापक पंडित व कलाकार विद्यार्थिनींना ढाल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. संकुलातून संयुक्ता कुलकर्णी यांना लेखन व दिग्दर्शनाचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले, तर अभिनयात वैष्णवी सानप (प्रथम), प्रांजल शिरसाट (द्वितीय), तर हर्षदा पवार (तृतीय) यांना गौरविण्यात आले.