येवला तालुक्यात सर्वच बेडस‌् फुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:14 AM2021-04-24T04:14:04+5:302021-04-24T04:14:04+5:30

शहरातील शाह हॉस्पिटल, साई सिद्धी हॉस्पिटल, सोनवणे हॉस्पिटल, अनिरूद्ध हॉस्पिटल, समर्थ हॉस्पिटल, राधेय हॉस्पिटल या ६ हॉस्पिटलनी कोविड सेंटर ...

All the beds in Yeola taluka are full | येवला तालुक्यात सर्वच बेडस‌् फुल्ल

येवला तालुक्यात सर्वच बेडस‌् फुल्ल

Next

शहरातील शाह हॉस्पिटल, साई सिद्धी हॉस्पिटल, सोनवणे हॉस्पिटल, अनिरूद्ध हॉस्पिटल, समर्थ हॉस्पिटल, राधेय हॉस्पिटल या ६ हॉस्पिटलनी कोविड सेंटर म्हणून मान्यता मिळावी यासाठी शासनस्तरावर प्रस्ताव दाखल केलेले आहेत. मात्र, त्या प्रस्तावाला मंजुरी मिळालेली नसली तरी कोविड रूग्ण तपासणी व औषधोपचारासाठी या रुग्णालयांना परवानगी देण्यात आलेली आहे. सद्यस्थितीत या रुग्णालयांमधील सर्वच बेड फुल्ल आहेत.

शासकीय नगरसूल ग्रामीण रुग्णालय व शहरातील उपजिल्हा रुग्णालय या डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरमधीलही सर्व बेड फुल्ल आहेत.

शहरात बाजीराव नगर, पारेगाव रोड, विठ्ठल नगर, विंचूर रोड मित्रविहार कॉलनी, बदापूर रोड हा भाग कोरोना हॉटस्पॉट ठरला आहे. शहरात सद्यस्थितीला ७७ अ‍ॅक्टिव्ह रूग्ण आहेत. ग्रामीण भागात नगरसूल (रूग्ण संख्या ४१), अंदरसूल (३१), पाटोदा (१६), राजापूर (१४), अनकाई (१४), धुळगाव (१३), सावरगाव (१२), आडगाव रेपाळ (११), सायगाव (१०), कुसमाडी (१०), शिरसागव लौकी (९) हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेली गावे आहेत. हॉटस्पॉट असणाऱ्या गावांमध्ये ग्रामपंचायत स्तरावर प्रतिबंधात्मक उपायोजना केल्या जात असून संशयितांच्या तपासण्यांबरोबरच आरोग्य विभागाच्यावतीने लसीकरण मोहीम देखील राबविण्यात येत आहे. येवला उपजिल्हा रुग्णालयात ४ रुग्ण ऑक्सिजनवर असून २ रुग्ण व्हेंटीलेटरवर आहेत. सद्यस्थितीत उपलब्ध ऑक्सिजन काही तासांपुरताच रूग्णांना देता येणार आहे. ऑक्सिजन घेण्यासाठी वाहन नाशिक येथे गेलेले असून आत्तापर्यंत त्यांना ऑक्सिजन मिळालेला नाही. त्यामुळे ऑक्सिजनची प्रतीक्षा वाढली आहे.

इन्फो

अपुरे मनुष्यबळ

खासगी रुग्णालयांसह सरकारी कोविड सेंटरलाही ऑक्सिजन व रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. आरोग्य यंत्रणेतील रिक्तपदांचा प्रश्‍न आजही कायम असून आहे त्या मनुष्यबळावर कामकाज करतांना आरोग्य यंत्रणेवर ताण पडत आहे. येवला उपजिल्हा रुग्णालयास तर गेले पाच दिवस रेमडेसिविर इंजेक्शन मिळालेच नाही. शेवटी बुधवारी (दि.२१) उपलब्ध निधीतून स्थानिक यंत्रणेने ३० इंजेक्शन खरेदी केली. तर योगायोगाने जिल्हास्तरावरून २० इंजेक्शन उपलब्ध झाली. तसे उपजिल्हा रूग्णालयातील दाखल रूग्णांसाठी २५९ इंजेक्शनची गरज असून स्थानिक पातळीवरून त्याची जिल्हास्तरावर मागणी केली जाते. मात्र, उपलब्ध नसल्याने स्थानिक यंत्रणा रोषाला बळी पडते आहे.

इन्फो

तालुक्यातील हाॅटस्पाॅट गावे (कंसात रुग्णसंख्या)

नगरसूल - ४१

अंदरसूल- ३१

पाटोदा - १६

राजापूर - १४

अनकाई -१४

फाेटो- २२ येवला कोरोना

===Photopath===

220421\222122nsk_18_22042021_13.jpg

===Caption===

फाेटो- २२ येवला कोरोना 

Web Title: All the beds in Yeola taluka are full

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.