येवला तालुक्यातील सर्वच बंधारे कोरडेठाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 11:55 PM2017-11-02T23:55:24+5:302017-11-02T23:55:29+5:30

सायगाव : जिल्ह्यात यंदा मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला मात्र पावसाने येवला तालुक्याच्या उत्तर पूर्व भागावर वक्र दृष्टी केल्याने तालुक्याच्या उत्तर पूर्व भागातील सर्वच बंधारे कोरडेठाक पडले असून शेतकर्यांना आता रब्बी हंगामाची चिंता लागली आहे.

All the bonds in Yeola taluka are Kordadek | येवला तालुक्यातील सर्वच बंधारे कोरडेठाक

येवला तालुक्यातील सर्वच बंधारे कोरडेठाक

Next


तालुक्यातील पूर्व भागातील सायगाव व पांजरवाडी परिसरातील कोळगंगा नदीवरील कोरडाठाक पडलेला बंधारा.

 

सायगाव : जिल्ह्यात यंदा मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला मात्र पावसाने येवला तालुक्याच्या उत्तर पूर्व भागावर वक्र दृष्टी केल्याने तालुक्याच्या उत्तर पूर्व भागातील सर्वच बंधारे कोरडेठाक पडले असून शेतकर्यांना आता रब्बी हंगामाची चिंता लागली आहे. सुरवाती पासून पाऊस नसल्याने बंधारे विहारी नद्या कोरडया असल्याने या पिकांना पाणी देण्यासाठी कोणतीच शास्वत व्यवस्था नाही. त्यामुळे पावसाच्या भरवश्यावरच शेती अवलंबून आहे. रब्बी हंगामाची पेरणी धोक्यात आली आहे. पिण्याच्या पाण्याची देखील तीव्र टंचाई भासण्याची चिन्हे आजच दिसत आहे. त्यामुळे रब्बी हंगामाला पाणी देणार कोठून असा प्रश्न शेतकर्यांना पडला आहे. यामुळे शेतकर्याकडून चिंता व्यक्त केली जात आहे.
सायगाव, नगरसुलसह उत्तर पूर्व भागातील 10 ते 15 गावांना कोणत्याही पाटपाण्याचा फायदा मिळाला नाही. पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव पोहोच कालव्याची प्रतीक्षा या भागातील तीन पिढ्यांनी केली. परंतु पाणी मिळण्याची चिन्हे दिसत नाही. येवला तालुक्याला वरदान ठरणारा मांजरपाडा प्रकल्प मार्गी लागला तर तालुक्याचा पूर्व भाग पूर्णपणे ओलिता खाली येईल. या प्रकल्पामुळे उत्तर पूर्व भागातील सायगाव, नगरसुल, पांजरवाडी, न्याहरखेडे, रेंडाळे, डोंगरगाव या गावांना पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था होणार आहे.
बुधवारी मांजरपाडा 1 या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता मिळाली. हा आशेचा किरण असला तरी नदी जोड प्रकल्पाअतर्गत नारपार खोर्यातील पाणी गोदावरी खोर्यात वळविले आण िपाण्याची उपलब्धता किमान पाच टीएमसीने वाढली या शिवाय बंद पाईप द्वारे शेतीला पाणी देण्याचे नियोजन झाले.अथवा कालव्याची वहन क्षमता वाढविली तरच डोंगरगाव पर्यत पाणी पोहोचू शकते. असे पाणीतज्ञाचा अभ्यास असल्याने मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी मिळण्याची शक्यता धूसर आहे.

Web Title: All the bonds in Yeola taluka are Kordadek

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.