दिवसभर उकाडा; संध्याकाळी शिडकावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 12:38 AM2019-06-12T00:38:23+5:302019-06-12T00:39:24+5:30
शहराचे वातावरण सध्या कमालीचे बदलले आहे. दिवसभर ढगाळ हवामानामुळे वातावरणात दमटपणा वाढल्याने नागरिकांना दिवसभर उकाडा सहन करावा लागत आहे. सायंकाळी साडेसहा वाजेनंतर पावसाच्या हलक्या सरींचा दोन दिवसांपासून शिडकावा होत आहे. मंगळवारीही (दि.११) सायंकाळी पावसाने शहर व परिसरात अल्पवेळ हजेरी लावली. यामुळे दिवसभराच्या उकाड्यापासून काहीसा नाशिककरांना दिलासा मिळाला.
नाशिक : शहराचे वातावरण सध्या कमालीचे बदलले आहे. दिवसभर ढगाळ हवामानामुळे वातावरणात दमटपणा वाढल्याने नागरिकांना दिवसभर उकाडा सहन करावा लागत आहे. सायंकाळी साडेसहा वाजेनंतर पावसाच्या हलक्या सरींचा दोन दिवसांपासून शिडकावा होत आहे. मंगळवारीही (दि.११) सायंकाळी पावसाने शहर व परिसरात अल्पवेळ हजेरी लावली. यामुळे दिवसभराच्या उकाड्यापासून काहीसा नाशिककरांना दिलासा मिळाला.
शनिवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसाने काही प्रमाणात तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी रविवारपासून पुन्हा उकाडा जाणवण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे रविवारनंतर मंगळवारी पुन्हा कमाल तापमान ३७ अंशांपर्यंत पोहोचले. सोमवारी सायंकाळी उशिरा पावसाने पुन्हा शहरासह काही उपनगरीय भागात सायंकाळी हजेरी लावली होती. मंगळवारीही पावसाच्या हलक्या सरींचा वर्षाव झाला. वाºयाचा वेग अल्पावधीतच मंदावल्याने पाऊस खूप वेळ टिकला नाही; मात्र विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाट रात्री सुरूच होता. सायंकाळी आलेल्या सरींनी नागरिकांना भिजविले. बाजारपेठेत तारांबळ उडाल्याचे चित्र पहावयास मिळाले.