पंचवटीत सर्व आस्थापना सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:15 AM2021-04-07T04:15:28+5:302021-04-07T04:15:28+5:30
विशेष म्हणजे प्रशासनातील अधिकारी शासनाच्या आदेशाबाबत संभ्रमात असून नेमक्या कोणत्या आस्थापना सुरू ठेवायच्या आणि कोणत्या बंद करायच्या याबाबत डोकेदुखी ...
विशेष म्हणजे प्रशासनातील अधिकारी शासनाच्या आदेशाबाबत संभ्रमात असून नेमक्या कोणत्या आस्थापना सुरू ठेवायच्या आणि कोणत्या बंद करायच्या याबाबत डोकेदुखी ठरत आहे. पंचवटीत बहुतांश ठिकाणी मंगळवारी सकाळपासून किराणा दुकान, दवाखाना, मेडिकल, आदी अत्यावश्यक सेवेची दुकाने सुरू होती. मात्र ज्या आस्थापना अत्यावश्यक सेवेत येत नाहीत, अशी बहुतांश दुकाने त्यात आइस्क्रीम विक्री, गॅरेज, हार्डवेअर, सलून, टेलर्स, इस्तरी दुकान खाद्यपदार्थ विक्री, हातगाड्या, चहाटपरी, आदी दुकानेही सुरू होती.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी दिवसा जमावबंदी लागू करण्यात आली खरी; मात्र काही ठिकाणी जीवनावश्यक वस्तू दुकाने वगळता अन्य बंद दुकानांबाहेर युवक घोळक्याने बसलेले दिसून आले; तर काहींनी नामी शक्कल लढवत दुकानाचे शटर्स नावाला बंद करून आतून सर्व काही सुरू ठेवत नियमांचे उल्लंघन केले.