१०७ विद्यार्थ्यांच्या घरात आकाशवाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2020 10:48 PM2020-10-02T22:48:38+5:302020-10-03T00:51:06+5:30
जानोरी : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या संकल्पनेतून व शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर यांच्या मार्गदर्शनाने ‘डोनेट अ डिव्हाईस’ हे अभियान जिल्हाभर सुरू असून गरीब, गरजू विद्यार्थ्यांना मोबाईल , दूरदर्शन संच, लॅपटॉप, रेडिओ दान करून त्यांचे अध्ययन सुकर करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. त्याच उपक्र माचा एक भाग म्हणून तळेगाव दिंडोरी केंद्रातील अक्र ाळे, ढकांबे, खतवड, इंदोरे, पिंपळनारे, मानोरी, तळेगाव दिंडोरी व वनारवाडी शाळांतील सर्व शिक्षक तसेच केंद्रप्रमुख व शिक्षण विस्तार अधिकारी यांनी केंद्रातील १०७ गरजू विद्यार्थ्यांना रेडिओ वितरित केले.

ठिकठिकाणच्या शाळांमध्ये गटशिक्षण अधिकारी बी. डी. कनोज, शिक्षण विस्तार अधिकारी एस. एस. घोलप यांच्या मार्गदर्शनानुसार केंद्रप्रमुख एस. एन. कोठावदे, स्थानिक शाळांचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद तसेच सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सर्व सदस्य, पालक तसेच ग्रामस्थांच्या उपस्थितीत हे रेडिओ गरीब विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आले. दररोज सकाळी ९.४० वाजता १०१.४ या वाहिनीवर विद्यावाहिनीच्या शैक्षणिक कार्यक्र मांचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले. या उपक्र मात मुख्याध्यापिका पुष्पा डावरे, सुनंदा जाधव, उल्का जाधव, चंद्रकांत पवार, धनंजय आहेर, प्रकाश भामरे, विलास जमदाडे, सुनंदा निकम, माधुरी थोरात, रविंद्र शिंदे, भाऊसाहेब नांदूरकर, रमेश मोरे, अशोक देवरे, राहुल सोनवणे, एन. जे. आहेर, चेतनकुमार घरटे, कल्पना गांगुर्डे, रूपाली कराड, प्रमिला जाधव आदींसह केंद्रातील सर्व शिक्षकांनी सहभाग घेतला.
वाड्या-वस्त्यांवर अध्यापन
कोवीड १९ च्या पाशर््वभूमीवर सध्या शाळा बंद असल्या तरीही शासनाच्या निर्देशानुसार शाळा बंद पण शिक्षण सुरू या उपक्र मांतर्गत तळेगाव दिंडोरी केंद्रातील जि. प. च्या सर्व आठही शाळांमधील शिक्षक आॅफलाईन व आॅनलाईन माध्यमातून अध्यापनाचे काम करीत आहेत. त्यामध्ये वॉटस अप, झूम मिट, गुगल मिट तसेच सोशल डिस्टन्स ठेवून वाडी, वस्तीवरील समाजमंदिर, पडवी अथवा मोकळ्या जागेत अध्यापन केले जात आहे.