मनसेचे सर्व नगरसेवक एकसंधच

By admin | Published: November 4, 2014 12:19 AM2014-11-04T00:19:02+5:302014-11-04T00:20:03+5:30

महापौर मुर्तडक : गिते संपर्क क्षेत्राबाहेरच

All the municipal corporators united | मनसेचे सर्व नगरसेवक एकसंधच

मनसेचे सर्व नगरसेवक एकसंधच

Next

मनसेचे सर्व नगरसेवक एकसंधचमहापौर मुर्तडक : गिते संपर्क क्षेत्राबाहेरचनाशिक : मनसेचे नेते वसंत गिते यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर अनेक नगरसेवकदेखील त्यांच्या समर्थनासाठी हीच भूमिका घेणार असल्याची चर्चा असली, तरी ही केवळ अफवाच आहे. सर्व नगरसेवक एकत्रच असून, कोणीही राजीनामा दिलेला नाही, अशी माहिती महापौर अशोक मुर्तडक यांनी दिली. अर्थात, गिते यांची पक्षावर कोणतीही नाराजी नसल्याचा दावा करताना, राजीनाम्याच्या घटनेनंतर त्यांच्याशी कोणताही संपर्क झालेला नसल्याचे महापौरांनी सांगितले.
मनसे नगरसेवकांची ओळखपरेड बैठक घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना महापौर अशोक मुर्तडक यांनी मनसेच्या सर्व नगरसेवकांच्या भावना जाणून घेतल्या असे सांगितले. गिते यांनी पक्षाचा राजीनामा दिला नाही. त्यामुळे ते अन्य पक्षात जाण्याबाबत प्रश्नच नाही. त्याचबरोबर दुपारी राजीनाम्याची माध्यमांमुळेच माहिती मिळाली परंतु भेट झालेली नाही, असे त्यांनी सांगितले. शशिकांत जाधव यांनी नगरसेवकांच्या बैठकीत त्यांना त्यांच्या काही भावना असतील तर व्यक्त करण्यास सांगितले होते; परंतु कोणीही वेगळी भूमिका व्यक्त न केल्याने सारेच नगरसेवक पक्षाबरोबर असल्याचे त्यांनी सांगितले. अशोक सातभाई यांनी कोणत्याही नगरसेवकाने राजीनामा दिला नसल्याचे सांगून, सोमवारी बोलावलेल्या बैठकीस केवळ चार नगरसेवक बाहेरगावी गेल्याने उपस्थित नव्हते बाकी सर्वच उपस्थित होते, असा दावा त्यांनी केला. (प्रतिनिधी)
साफसफाई शहराची
की मनसेची?
४नगरसेवकांच्या बैठकीत तटबंदी करणाऱ्या मनसेच्या महापौरांना माध्यम प्रतिनिधींनी अनेक प्रश्न विचारले आणि गिते यांनी पक्षाचा राजीनामा दिला नसताना नगरसेवकांच्या फुटीच्या भीतीतून बैठक बोलावली काय, असा प्रश्न केला. यावर महापौरांनी आपण शहराच्या साफसफाईबाबत नगरसेवकांशी चर्चा केली, असे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला खरा; परंतु ही साफसफाई शहराची की मनसेची, हे मात्र स्पष्ट केले नाही.

Web Title: All the municipal corporators united

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.