नाशिक जिल्हाबाधिताच्या संपर्कातील सारे निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 10:42 PM2020-03-31T22:42:54+5:302020-03-31T22:43:33+5:30
नाशिक : जिल्ह्यातील ग्रामीण भागात सापडलेल्या कोरोनाबाधित रुग्णावर उपचार सुरू असून, त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. दरम्यान, त्याच्या संपर्कात आलेल्या पंधरा जणांच्या तपासणीचे वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आल्याने यंत्रणेने सुस्कारा सोडला आहे. प्रलंबित नमुन्यांचा अहवाल बुधवारी मिळणार आहे. आरोग्य विभागाने गावातील सुमारे चौदाशे कुटुंबांची वैद्यकीय तपासणी पूर्ण केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

गेल्या दोन दिवसांत कोरोना संशयित रुग्णांची संख्या २४ वर पोहोचली असून, या सर्वांचे स्वॅब प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. बाधित रुग्णाच्या प्रकृतीत सुधार होत असून, त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या तपासणीतही कोरोनासदृश लक्षणे दिसत नसल्याने आरोग्य विभागाला हायसे वाटले आहे.
संपूर्ण गावच आगामी चौदा दिवसांसाठी क्वॉरण्टाइन करण्यात आले आहे. या दिवसांमध्ये दररोज प्रत्येक व्यक्तीची आरोग्य तपासणी केली जाईल. त्याचबरोबर आजूबाजूच्या गावांवरही आरोग्य विभागाने लक्ष केंद्रित केले असल्याची माहिती देण्यात आली आहे. संपर्कात आलेल्या व्यक्ती साधारणत: पन्नास वयोगटाच्या आतील असल्यामुळे संशयित रुग्ण बरे होतील, असा विश्वासही व्यक्त होत आहे. निफाड तालुक्यात ५० जण होम क्वॉरण्टाइन बाधिताच्या संपर्कातील जवळपास ८० लोक संपर्कात आल्याच्या संशयावरून त्या व्यक्तींचाही आरोग्य व पोलीस विभागाच्या मदतीने शोध घेतला जात आहे. रुग्णाच्या गावातील चौदाशे कुटुंबांची गेल्या दोन दिवसांत आरोग्य कर्मचाऱ्यांनी तपासणी पूर्ण केली आहे.
निफाड तालुक्यात रुग्ण आढळल्यानंतर संपूर्ण गावाची आरोग्य तपासणी करून सर्वांना होम क्वॉरण्टाइन करण्यात येणार असल्याच्या चर्चेचा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी इन्कार केला आहे. रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांनाच निगराणीखाली ठेवण्यात येणार आहे. या रुग्णाच्या संपर्कातील ५० जणांना होम क्वॉरण्टाइन करण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे