जीवनावश्यक वगळता इतर दुकाने बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 02:59 PM2020-05-05T14:59:13+5:302020-05-05T14:59:19+5:30
पेठ -शासनाने दि.१७ मे पर्यंत वाढवलेला लॉकडाऊन चा कालावधी आणी त्यानंतर काही भागात इतर व्यावसायिकांना दिलेली सुट यातून पेठ शहरातील मुख्य बाजारपेठ वगळण्यात आली असून जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व व्यवसाय पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.

उपविभागीय अधिकारी, तहसीलदार पेठ व नगरपंचायत मुख्याधिकारी यांनी काढलेल्या संयुक्त प्रसिध्दी पत्रकान्वये पेठ नगरपंचायत अंतर्गत बलसाडरोड, बाजारपेठ, भवानी चौक, जोगमोडी रोड, मटन मार्केट या भागातील जीवनावश्यक व शेतीपोयोगी वगळता इतर सर्व व्यवहार पुर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रार्नुभाव आणी त्यावर करावयाच्या संभाव्य उपाययोजना करण्यासाठी सदर निर्णय घेण्यात आला आहे.उर्वरीत निवासी भागातील दुकाने शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करून सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शिवाय विनाकारण भटकणार्या नागरिकांवर प्रशासनाची करडी नजर असणार आहे.
---------------------
भाजीबाजाराचे स्थलांतर
पेठ शहरातील मध्यवर्ती भागातील भवानी चौकातील भाजी बाजार सप्तशृंगी नगर च्या जंगल कामगार सोसायटीच्या मोकळ्या जागेत तसेच पश्मिमेकडील तोंडवळ रस्त्याला स्थलांतरीत करण्यात आला असून ग्राहकांनी योग्य खबरदारी घेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. एका दुकानासमोर ५ पेक्षा जास्त व्यक्ती ऊभ्या राहणार नाहीत शिवाय प्रत्येक व्यक्तीमध्ये किमान ६ फुटाचे अंतर ठेवण्याच्या सुचना निर्गिमत करण्यात आल्या आहेत.