ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी सर्वपक्षीय एकवटले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2020 10:22 PM2020-10-22T22:22:16+5:302020-10-23T00:02:21+5:30
पेठ - केवळ खरीपाच्या पिकावर वर्षभराची गुजरान करणाऱ्या तालुक्यातील शेतकऱ्यांचे अवकाळी पावसाने सर्वच हिरावून घेतल्याने पेठ तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी सर्व राजकिय पक्षांनी एकत्र येत निवेदन सादर केले आहे.
पेठ - केवळ खरीपाच्या पिकावर वर्षभराची गुजरान करणाऱ्या तालुक्यातील शेतकऱ्यांचे अवकाळी पावसाने सर्वच हिरावून घेतल्याने पेठ तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी सर्व राजकिय पक्षांनी एकत्र येत निवेदन सादर केले आहे.
तहसीलदार संदिप भोसले, तालुका कृषी अधिकारी अरविंद पगारे यांना दिलेल्या निवेदनात या वर्षी खरीप हंगामावर प्रारंभा पासूनच संकटात सापडला असून आदिवासी भागातील प्रमूख पिक असलेली भात व नागालीची शेती भूईसपाट झाली आहे शिवाय पेठ तालुक्यात इतर पिके घेतली जात नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा , मार्च पासूनचे संपूर्ण वीजबील माफ करावे , पिक कर्जातून शेतकरी मुक्त करावा , रोजगार हमीची कामे सुरू करावीत , स्थलांतरीत शेतमजूरांना काम द्यावे , शेतसारा व इतर वसूली थांबवावी आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले .
याप्रसंगी शिवसेनेचे तालुकाप्रमूख भास्कर गावीत , राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दामू राऊत , माकपाचे तालुकाध्यक्ष देवराम गायकवाड , कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष विशाल जाधव , मनसेचे तालुकाध्यक्ष सुधाकर राऊत , सभापती विलास अलबाड , गोकूळ झिरवाळ, गिरीश गावीत , नामदेव मोहाडकर, तुळशिराम वाघमारे ,छबिलदास चोरटे, मनोहर चौधरी, शामराव गावीत, गणेश गवळी, नंदू गवळी, पद्माकर कामडी , रामदास वाघेरे, किरण भूसारे, मोहन कामडी,करण करवंदे यांचे सह सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते