पाणी सोडण्याविरोधात सर्वपक्षीय लढा : फरांदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 01:20 AM2018-10-17T01:20:12+5:302018-10-17T01:20:48+5:30
मराठवाड्याला पाणी देण्यास भाजपा आमदार देवयानी फरांदे यांनी कडाडून विरोध केला असून, प्रसंगी सर्वपक्षीय लढा उभारण्याची तयारी केली आहे. जायकवाडीतील वापरण्यायोग्य साठ्यासाठी सात टीएमसी पाण्याची गरज असून, गतवेळचा अनुभव बघता हे पाणी नाशिकमधून सोडले तरी बाष्पीभवनामुळे मराठवाड्यात पोहचणे कठीण आहे. त्यामुळे जायकवाडीच्या मृत पाणी साठ्यातून मराठवाड्याला पाणी द्यावे, अशी मागणीही फरांदे यांनी केली आहे.
नाशिक : मराठवाड्याला पाणी देण्यास भाजपा आमदारदेवयानी फरांदे यांनी कडाडून विरोध केला असून, प्रसंगी सर्वपक्षीय लढा उभारण्याची तयारी केली आहे. जायकवाडीतील वापरण्यायोग्य साठ्यासाठी सात टीएमसी पाण्याची गरज असून, गतवेळचा अनुभव बघता हे पाणी नाशिकमधून सोडले तरी बाष्पीभवनामुळे मराठवाड्यात पोहचणे कठीण आहे. त्यामुळे जायकवाडीच्या मृत पाणी साठ्यातून मराठवाड्याला पाणी द्यावे, अशी मागणीही फरांदे यांनी केली आहे. जायकवाडी धरणातील उपयुक्त साठ्यासाठी पाणी पडत असल्याने मेंढीगिरी समितीच्या शिफारशीनुसार नाशिक आणि नगरमधून पाण्याची मागणी होत आहे. त्यासंदर्भात औरंगाबाद येथे गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाची बैठक झाली आणि १२ टीएमसी पाणी सोडावे, अशी चर्चा करण्यात आली. यासंदर्भात, आमदार फरांदे यांनी पाणी सोडण्यास विरोध केला आहे. मुळातच जायकवाडी धरणाचा मृत पाणी साठा २६ टीएमसी इतका आहे. राज्यातील कोणत्याही धरणाचा इतका मृत साठा नाही. यावर्षी जायकवाडीच्या जलाशयात खरिपाचे पाणी धरून ४३.५ टीएमसी पाणी उपलब्ध झाले आहे. धरणाचा मृत साठ्याचा विचार केला तर धरणात ६९.५ टीएमसी पाणी उपलब्ध आहे. ते उद्योग आणि शेतीसाठी मुबलक आहे.
परंतु खरीप हंगामातील १६ टीएमसी वापर झाल्याने सध्या ११ टीएमसी पाणी सोडण्याचे नियोजन असले तरी मुळात गेल्यावर्षी अशाच प्रकारे दहा टीएमसी पाणी नाशिकमधून सोडल्यानंतर ६० टक्के पाण्याचे बाष्पीभवन झाल्याने पुरसे पाणी पोहोचले नव्हते त्यामुळे आता तरी सात टीएमसी पाणी जायकवाडीत पोहोचणे शक्य होणार नाही. यामुळे आता मृत साठ्यातील पाणीच वापरावे, अशी मागणी फरांदे यांनी केली आहे.
जायकवाडी धरणातून यापूर्वीही गरजेनुसार मृत साठ्यातील पाण्याचा वापर करण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर आताही मृत पाणी साठ्याचा वापर करावा, अशी मागणी प्रा. फरांदे यांनी केली आहे. जायकवाडी धरणात मृत साठ्याप्रमाणे कॉरीओव्हर स्टोअरेज नाशिकच्या गंगापूर धरण्यात यावे यासाठी महाराष्टÑ जलसंपत्ती नियमन प्राधीकरणाला प्रा. फरांदे यांनी पत्र दिले आहे.