कळवणला सर्वपक्षीय बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 12:06 AM2019-05-30T00:06:12+5:302019-05-30T00:23:53+5:30

सटाणा शहरासाठी पुनंद धरणातून मंजूर करण्यात आलेल्या जलवाहिनीचे काम तत्काळ सुरू करण्याबाबत उच्च न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले असून, कळवण व देवळा तालुक्यातील जनतेचा व पुनंद खोºयातील शेतकऱ्यांचा या योजनेला सुरुवातीपासून विरोध असल्याने शासनाने या प्रश्नी जनतेच्या भावनांचा विचार करावा,

 All-party meeting with Kalavan | कळवणला सर्वपक्षीय बैठक

कळवणला सर्वपक्षीय बैठक

Next

कळवण : सटाणा शहरासाठी पुनंद धरणातून मंजूर करण्यात आलेल्या जलवाहिनीचे काम तत्काळ सुरू करण्याबाबत उच्च न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले असून, कळवण व देवळा तालुक्यातील जनतेचा व पुनंद खोºयातील शेतकऱ्यांचा या योजनेला सुरुवातीपासून विरोध असल्याने शासनाने या प्रश्नी जनतेच्या भावनांचा विचार करावा, नाही तर जनआंदोलन उभारण्याचा इशारा कळवण तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी येथे आयोजित बैठकीत दिला. पुढील रणनीती ठरविण्यासाठी शनिवार, दि. १ जून पुनंद धरण कार्यस्थळावर महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
पुनंद जलवाहिनीचे काम तत्काळ सुरू करण्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर बुधवारी कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात सर्वपक्षीय पदाधिकारी व शेतकºयांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस आमदार जे.पी.गावित,जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार, जलवाहिनीविरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष देविदास पवार, बाजार समितीचे सभापती धनंजय पवार, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख कारभारी आहेर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र हिरे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख अंबादास जाधव, जिल्हा परिषदेचे माजी सभापती शैलेश पवार उपस्थित होते.
ज्या शेतकºयांनी धरणासाठी जमिनी दिल्या त्यांच्या उद्देशाकडे दुर्लक्ष केले जात असून एकजुटीने लढा उभारण्याची गरज असल्याचे मत आमदार जे.पी.गावित यांनी व्यक्त केले. पुनंद खोºयातीलच नव्हे तर परीसरातल्या सर्वच शेतकºयांनी आणि आदिवासी बांधवांनी हक्काचे पाणी वाचवण्यासाठी पुढे यायला हवे असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांनी केले. यापूर्वी आंदोलने करूनही पाणीयोजनेचा घाट घातला जात असून, कळवणकरांची पाणी देण्याला नव्हे तर पाइपलाइनला असलेल्या विरोधाची भूमिका शासन व प्रशासनाने समजून घ्यावी असे मत जलवाहिनीविरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष देवीदास पवार यांनी व्यक्त केले.
बाजार समिती सभापती धनंजय पवार, काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र हिरे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, कारभारी आहेर, हेमंत पाटील यांनी आपली भूमिका मांडली.
कालव्याद्वारे पाणी न्यावे
सटाणा शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी राज्य शासनाने
५५ कोटी रु पयांची पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. मात्र कळवणकरांच्या विरोधामुळे अद्यापपर्यंत या योजनेचे काम सुरु होऊ शकलेले नाही. हे काम तात्काळ सुरू करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने जिल्हाधिकाºयांना दिल्याने काम सुरु होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. मात्र कळवण तालुक्यातील शेतकºयांचा विरोध कायम असून, पाइपलाइनद्वारे नव्हे तर कालव्याद्वारे पाणी न्यावे यावर कळवणकर ठाम आहेत.

Web Title:  All-party meeting with Kalavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.