त्र्यंबकेश्वरला सर्वपक्षीय शोकसभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 01:04 AM2018-08-20T01:04:48+5:302018-08-20T01:04:54+5:30
त्र्यंबकेश्वर : भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रविवारी सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी भाजपा महाराष्ट्र प्रदेशचे चिटणीस लक्ष्मण सावजी होते.

या शोकसभेत वक्त्यांनी अटलजींच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी रिपाइंचे तालुकाध्यक्ष शांताराम बागुल, शिवसेनेचे भूषण अडसरे, सामाजिक कार्यकर्ते उमेश सोनवणे, बाळ चांदवडकर यांनी अटलजी राजकारणातले भीष्मपितामह होते, असे म्हटले. श्रीकांत मुळे, त्र्यंबकेश्वर देवस्थान विश्वस्त तृप्ती धारणे, डॉ. दिलीप जोशी, त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाचे अध्यक्ष प्रशांत गायधनी, पंकज धारणे, भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष सुयोग वाडेकर, विश्व हिंदू परिषदेचे गोविंदराव मुळे, श्रीकांत मुळे, प्रा. सुनील बच्छाव, नगरसेवक मंगला आराधी, कल्पेश कदम, ज्येष्ठ नेते तथा माजी नगराध्यक्ष बाबूराव थेटे, विद्यमान नगराध्यक्ष
पुरुषोत्तम लोहगावकर, लक्ष्मण सावजी यांनी मनोगत व्यक्त केले.
शोकसभेसाठी भाजपाचे शहराध्यक्ष श्यामराव गंगापुत्र, हर्षल भालेराव, विनायक माळेकर, विष्णू दोबाडे, देवयानी निखाडे, कमलेश जोशी, विजय शिखरे, तेजस ढेरगे, प्रभावती तुंगार, शीतल उगले उपस्थित होते.