कळवणला सर्वपक्षिय आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 02:47 PM2020-09-15T14:47:06+5:302020-09-15T14:47:18+5:30

कळवण : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातल्याच्या निषेधार्थ कळवणला सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले.

All-party movement to inform | कळवणला सर्वपक्षिय आंदोलन

कळवणला सर्वपक्षिय आंदोलन

Next

कळवण : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातल्याच्या निषेधार्थ कळवणला सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये कांद्याला चांगला भाव मिळू लागल्याने केंद्र सरकारच्या पोटात पोटसुळ उठला आहे त्यामुळे केंद्राने कांदा निर्यात बंदी करण्याचा निर्णय घेतला असल्याची टीका करुन शेतकरी संघटनेसह कांदा उत्पादक संघटना व सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारचा निषेध नोंदवत कळवण बस स्थानकाजवळ रस्त्यावर काही काळ ठिय्या मांडून रास्ता रोको आंदोलन केले. शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देविदास पवार, ज्येष्ठ नेते रविंद्र देवरे,बाजार समितीचे सभापती धनंजय पवार, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, शेतकरी नेते शांताराम जाधव,स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद पगार, कांदा उत्पादक संघटनेचे तालुकाध्यक्ष विलास रौंदळ, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटनेसह सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात भाषणबाजी करुन आंदोलन केले. केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातल्याने कळवण तालुक्यात कांदा उत्पादक शेतक?्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. कांद्याचा पूर्ण हंगाम शेतकऱ्यांचा वाया गेला असतांना फक्त दोन ते चार रुपये किलो भाव मिळत होता. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च सुद्धा निघत नव्हता, भाव मिळतील या अपेक्षेने कांदा साठवला तो ही चाळीत सडला. थोडाफार शिल्लक राहिला. त्याला समाधानकारक दर मिळतो आहे. पण, झालेलं नुकसान बघता, हातात काही राहणार नाही. त्यात निर्यात बंदीमुळे भाव पडले. यावेळी पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांना निवेदन देण्यात आले. रोको आंदोलनात घनश्याम पवार, पोपट पवार, जितेंद्र पगार,भाऊसाहेब पवार, प्रदीप पगार, टिनू पगार, दादा जाधव, रामा पाटील, मधुकर वाघ, रमेश पाटील, जगन पाटील, प्रल्हाद देवरे, संदीप वाघ, गोरख देवरे, महेंद्र पवार, काशिनाथ गुंजाळ, दिलीप शेवाळे, अमोल रौंदळ, राहूल पवार, नितीन पवार, वैभव देवरे, नितीन खैरनार आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: All-party movement to inform

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक