सर्व डाळी किलोमागे आठ रुपयांनी झाल्या स्वस्त; पालेभाज्या तेजीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:11 AM2021-07-19T04:11:30+5:302021-07-19T04:11:30+5:30
चौकट- डाळिंब ८५ रु. किलो सध्या घाऊक बाजारात डाळिंबाला चांगले दर मिळत असून, आरक्ता २५ ते ५५ आणि मृदृला ...
चौकट-
डाळिंब ८५ रु. किलो
सध्या घाऊक बाजारात डाळिंबाला चांगले दर मिळत असून, आरक्ता २५ ते ५५ आणि मृदृला ३० ते ८५ रुपये किलोचा दर मिळत आहे. बाजारात फळांची आवक कमी झाली आहे. त्या तुलनेत मागणी चांगली असल्याने फळांचे दर तेजीत आहेत. केळी ८.५० ते १२.५० रुपये किलोने विकली जात आहे.
चौकट-
भोपळा दहा रुपयांनी उतरला
मागील सप्ताहापर्यंत तेजीत असलेले भोपळ्याचे दर पात ते दहा रुपयांनी खाली आले आहेत. सध्या घाऊक बाजारात भोपळा पाच ते साडेअकरा रुपये किलो या दराने विकला जात आहे. कारले, दोडके, गिलके या फळभाज्यांचे दर टिकून असून, कारले २१ रुपये किलोपर्यंत विकली जात आहेत.
चौकट-
तेल पुन्हा महागले
मध्यंतरी वेगवेगळ्या कारणांनी खाद्य तेलांचे दर उतरले होते. १३० रुपये लिटरपर्यंत असलेले दर आता पुन्हा १४० रुपयांपर्यंत आले आहे. किराणा बाजारातील इतर मालात फारसा चढउतार नाही. बदाम आणि मसाल्याच्या पदार्थांमध्ये तेजी असल्याचे दिसून आले .
कोट-
मागील १५ दिवसांमध्ये जवळपास सर्वच प्रकारच्या डाळींच्या दरामध्ये घट झाली असून, बदाम आणि मसाल्याच्या पदार्थांचे दर थोडेफार तेजीत आहेत. किराणा बाजारात सध्या ग्राहकी चांगली असली तरी काहीसे मंदीचे सावत असल्यासारखे दिसत आहे.
- अनिल बूब, किराणा व्यापारी
कोट-
अख्खा जून महिना कोरडा गेला आहे. वातावरणातही अनेकवेळा ढगाळ वातावरणामुळे भाजीपाला पिकविण्यासाठी होणारा खर्च वाढला आहे. भाज्या पिवळ्या पडू नयेत कुठल्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी औषध फवारणी करावी लागते. त्यातुलनेत भाजीपाल्याला मिळणारा दर कमी आहे.
- अविनाश पवार, शेतकरी
कोट-
तेलाचे दर कमी झाल्याने दिलासा मिळाला होता, पण पुन्हा दर वाढू लागले आहेत. कोरोनाच्या या संकटकाळात सर्वसामान्य ग्राहकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. किरकोळ बाजारात आम्हाला भाजीपाला महागड्या दराणेच खरेदी करावा लागतो.
- रंजना गवांदे, गृहिणी