शहरातील सर्व नद्या शुद्ध, केवळ अकरा नाले प्रदूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 01:26 AM2019-08-21T01:26:50+5:302019-08-21T01:27:25+5:30

उत्तम हवापाणी म्हणून किंवा सध्याच्या वापरात असलेल्या लाइव्हलीहुड मनल्या जाणाऱ्या नाशिक शहरात आता प्रदूषण वाढू लागले आहे. शहरातील सर्व नद्या प्रदूषणमुक्तअसल्या तरी अकरा नैसर्गिक नाले प्रदूषण असल्याचा निष्कर्ष निघाल्याने त्याविषयी शंका -कुशंका निर्माण झाल्या आहेत. शहरातील हवाही उत्तम आहे, मात्र केवळ काही व्यावसायिक भागात ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट असल्याचा दावा महापालिकेने या अहवालात केला आहे.

All rivers in the city are pure, polluting only eleven drains | शहरातील सर्व नद्या शुद्ध, केवळ अकरा नाले प्रदूषित

शहरातील सर्व नद्या शुद्ध, केवळ अकरा नाले प्रदूषित

Next
ठळक मुद्देमनपाचा अजब निष्कर्ष : विविध भागात आवाजाचा दणदणाट

नाशिक : उत्तम हवापाणी म्हणून किंवा सध्याच्या वापरात असलेल्या लाइव्हलीहुड मनल्या जाणाऱ्या नाशिक शहरात आता प्रदूषण वाढू लागले आहे. शहरातील सर्व नद्या प्रदूषणमुक्तअसल्या तरी अकरा नैसर्गिक नाले प्रदूषण असल्याचा निष्कर्ष निघाल्याने त्याविषयी शंका -कुशंका निर्माण झाल्या आहेत. शहरातील हवाही उत्तम आहे, मात्र केवळ काही व्यावसायिक भागात ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट असल्याचा दावा महापालिकेने या अहवालात केला आहे.
महापालिकेच्या मंगळवारी
(दि. २०) झालेल्या महासभेत पर्यावरण विभागाच्या वतीने पर्यावरण अधिकारी नितीन वंजारी यांनी अहवाल सादर केला. दरवर्षी १ जानेवारी ते ३१ डिसेंबर दरम्यान शहराच्या विविध भागांत ध्वनी, वायू आणि जल प्रदूषणाची तपासणी केली जाते. त्यानंतर यासंदर्भातील अहवाल त्यापुढील वर्षात जुलै महिन्याच्या आत महासभेवर ठेवून तो मंजूर करून घेणे कायद्याने बंधनकारक आहे. त्यानुसार हा अहवाल मांडण्यात आला होता. नदी प्रदूषण हा सर्वाधिक चर्चेचा विषय असून, अनेक आंदोलने झाल्यानंतरदेखील नदी शुद्ध नसल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहेत. महापालिकेच्या वतीने गोदावरी, दारणा, नासर्डी व कपिला या चार नद्यांचे नमुने तपासण्यात आला. मनपाने पाण्याचे प्रवाहाच्यावर, मध्य प्रवाह आणि निम्न स्थानी नमुने तपासल्यानंतर त्यात प्रदूषणकारी घटक नसल्याचा पर्यावरण विभागाचा दावा आहे. याशिवाय महापालिका क्षेत्रात २५ नाले असून, त्यातील ११ नाले प्रदूषित आहेत. या नाल्यांमधील बीओडी (बायोकेमिकल आॅक्सिजन डिमांड) वाढली असून, पाण्यातील आॅक्सिजन कमी झाल्यामुळे प्रदूषण वाढल्याचा पर्यावरण विभागाचा दावा आहे. बारदान फाटा नाला, लेंडी
नाला, सोमेश्वर नाला, कन्नमवार पूल नाला, जाधव बंगला नाला, पिंपळपट्टी नाला, चिखली नाला, जोशीवाडा नाला, मानूर नाला, चव्हाण कॉलनी नाला, प्रदूषित असल्याचे आढळले आहे. ध्वनी प्रदूषणाच्या मापनात अनेक ठिकाणी आवाजाचा दणदणाट आढळला आहे. ध्वनी प्रदूषणासाठी दिवसा ५५, तर रात्री ४५ डेसीबलपर्यंत ध्वनी मर्यादेचा निकष आहे. मात्र ही मर्यादा ओलांडून या भागात दिवसा सरासरी ७० डेसीबल, तर रात्री ६५ डेसीबलपर्यंत आवाज आहे.
हवा चांगली
महापालिकेने हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी आयटीआय सिग्नल तसेच सातपूर, अंबड एमआयडीसी, मेनरोड, मुंबई नाका, जुने सी.बी.एस, पंचवटी कारंजा व द्वारका येथील हवेचे नमुने तपासले त्यातील धुलीकण, अतिसूक्ष्म धुलीकण, सल्फरडाय आॅक्साइड, नायट्रोजनडाय आॅक्साइड आणि कार्बन मोनाक्साइड यांची तपासणी करण्यात आली मात्र हे सर्वच निकषानुसार असल्याचे आढळले असा दावा अहवालात करण्यात आला आहे.
औद्योगिक क्षेत्र हे सर्वात प्रदूषणकारी घटक असल्याचे मानले जात असताना प्रत्यक्षात मात्र नाशिक शहरातील सातपूर आणि अंबड येथे ध्वनी प्रदूषण होत नाही, असा अजब दावा अहवालात करण्यात आला आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: All rivers in the city are pure, polluting only eleven drains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.